कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा… फ्लेक्सद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
पुणे शहरातील कोथरूड परिसरात मागील काही दिवसांपासून उद्भवलेल्या काय-सुव्यवस्थेच्या पाश्र्वभूमीवर समस्त कोथरूडवासीयांनी घटनांचा निषेध केला आहे. कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड यापूर्वी असं कधीच नव्हतं, अशा प्रकारचा आशय लिहिलेला फ्लेक्स कोथरूडमध्ये उभारला आहे. संबंधित आशयाचे लिखाण असलेले फ्लेक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने पत्ररूपी स्वरूपात लावण्यात आले आहेत. समस्त कोथरूडकर आणि त्रस्त नागरिक यांच्या सौजन्याने हे फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
कोथरूड परिसरात 19 फेब्रुवारीला भाजप कार्यकर्त्या तरुणाला कुख्यात गुंड गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर लगेचच कोयताधारी टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोथरूड परिसरात अशा प्रकारच्या अनेक घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पोलिसांकडून उपाययोजना न केल्यामुळेच गुन्हेगारीला पेव फुटले आहे. कोथरूडवासीयांसह त्रस्त नागरिकांनी फ्लेक्स उभारून गुन्हेगारीचा निषेध केला आहे.
आमचं कोथरूड यापूर्वी असं कधीच नव्हतं…
कोथरूडमध्ये काही भागात फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने पत्र अशी सुरुवात फ्लेक्सची केली आहे. आमचं कोथरूड यापूर्वी असे कधीच नव्हते. कोथरूडचा बीड होण्यापासून वाचवा. गुन्हेगारीचा बिमोड करा, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करा, पेन्शनरांसह ज्येष्ठांना सुरक्षितता पुरविण्यासाठी प्राधान्य द्या. कायदा-सुव्यवस्था उद्भवणार नाही यासाठी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश द्या, अशा प्रकारची मागणी फ्लेक्सद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये फ्लेक्सची चर्चा सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List