आमदार धस राजीनामा द्या, शिरूर कासार बंद
कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उैर्फ खोक्याला तत्काळ अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज रविवारी शिरूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नागरिकांनी प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. यावेळी सतीश भोसलेला तत्काळ अटक झालीच पाहिजे, आमदार सुरेश धस राजीनामा द्या, अशा घोषणांनी शिरूर दणाणून गेले. या मोर्चात नागरिकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरूर कासार गावात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली. आरोपीला वाचवण्यात आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List