भरधाव कारची ट्रकला धडक, पाच जणांचा जागीच मृत्यू
भरधाव कार ट्रकला धडकल्याने भीषण अपघाताची घटना रविवारी घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात सिबार गावात हा अपघात घडला. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सर्व मयत बंगळुरूचे निवासी होते. बंगळुरूहून कारने चालले होते. यादरम्यान सिबार गावात कार ट्रकला धडकली. यात कारमधील सर्वांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.
अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र अतिवेग आणि बेदरकार वाहन चालवणे यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List