यमुना नदीत क्रूझ सफरीचा आनंद
यमुना नदीत पुन्हा फेरी सुरू होणार आहे. यासंदर्भातील करार नुकताच झाला. आयडब्ल्यूएआयने दिल्ली सरकार आणि इतर संबंधित एजन्सींच्या सहकार्याने वॉटर टॅक्सी चालवण्यासाठी यमुना नदीचा चार किलोमीटरचा भाग निश्चित केला. सोनिया विहार आणि जगतपूर दरम्यान फेरी सेवा चालवण्याची योजना आहे.
पर्यावरणाचा विचार करून सौरऊर्जेवर चालणाऱ्या हायब्रिड फेरी चालवल्या जातील. वॉटर टॅक्सीत एकाच वेळी 20 ते 30 प्रवासी बसू शकतील. जलमार्गावरील प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाहतूक सुलभ करण्यासाठी हा नावीन्यपूर्ण प्रयत्न असल्याचे समजते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लाईफ जॅकेट्स, उद्घोषणा यंत्रणा, बायो टॉयलेट यासारख्या सुविधा असतील. यमुनेवर जेट्टी, पर्यावरणाला हानी न करणाऱ्या सोलार / इलेक्ट्रिक बोटी, तिकीट बूथ, चार्जिंग पॉईंट, कॅफेटेरिया, वेटींग एरिया असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List