“त्यांनी गर्लफ्रेंडसाठी केलं असतं,पण माझ्यासाठी नाही….” अमिताभ यांच्याबद्दल जया बच्चन स्पष्टच बोलल्या
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. यांच्या लग्नाला आता तब्बल 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. चित्रपटांमध्येही अमिताभ आणि जया यांची जोडी हीट ठरली. आजही बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंब म्हटलं की त्यांचा एक वेगळाच प्रभाव पाहायला मिळतो. तसेच या कुटुंबाच्या तसेच जया आणि अमिताभ यांच्या अनेक मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत.
जया बच्चन यांची मुलाखत व्हायरल
अशाच एका मुलाखतीत जया यांनी अमिताभ यांच्या एकंदरीत स्वभावाबद्दल तसेच त्यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आहे. सिमी गरेवालच्या शोमध्ये जया बच्चन पती अमिताभ बच्चन यांच्य आल्यासोबत आल्या होत्या. त्यावेळी अमिताभ यांना पती म्हणून 1o पैकी किती गुण द्याल? असं जया यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा बिग बींनी स्वत: 7 तर जया बच्चन यांनी 5 गुण दिले होते. तसेच जया यांनी असंही म्हटलं होतं की, “मी त्यांची प्रथमिक प्रायोरीटी कधीच नव्हते. तुम्ही माझं मत विचाराल तर अमित यांची पहिली प्राथमिकता त्यांचे आई-वडील, नंतर मुलं आणि नंतर मी आहे. कदाचित माझ्याही आधी त्यांना त्यांचं प्रोफेशन आणि मग नंतर मी किंवा कदाचित कोणीतरी दुसरं असेल,” असं म्हणून जया हसायला लागतात. “मेकअप आर्टिस्ट किंवा कार देखील त्यांची प्रायोरिटी आहेत” असं त्यांनी सांगितलं.
अमिताभ रोमँटिक आहेत का?
त्यानंतर जया यांना विचारण्यात आलं अमिताभ रोमँटिक आहेत का? असं विचारल्यावर जया बच्चन यांनी नकार दिला आणि म्हणाल्या “माझ्याबरोबर तर नाही. मला आनंद आहे की मला याची सवय झाली आहे, मी खूश आहे,” पुढे त्यांना विचारण्यात आलं की त्यांच्या मते रोमॅंटिक असणं म्हणजे काय? तेव्हा जया म्हणाल्या “वाइन आणि फुलं आणणं” , त्यानंतर जेव्हा अमिताभ यांना विचारण्यात आलं त्यांनी हे कधीच का कले नाही? तेव्हा जया यांनीच उत्तर देत म्हटलं, “कदाचित त्यांची गर्लफ्रेंड असती तर त्यांनी हे केलं असतं, परंतु माझ्याबरोबर तर केलं नाही.”जया-अमिताभ यांची ही मुलाखत बरीच जुनी आहे. पण त्या मुलाखतीमधील काही व्हिडीओ हे व्हायरल होत असतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List