Fruits For Healthy Skin- निखळ कांतीसाठी ही फळे आहारात असायलाच हवीत; त्वचेसाठी ही फळे आहेत वरदान!!

महिलांच्या सौंदर्यात चेहरा हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळेच चेहरा जपताना महिला अनेक प्रकारची कसरत करताना दिसतात. अनेक नामांकित ब्रॅंन्डस् आज खूप प्रकारचे मलम लोशन आणि ट्रिटमेंट घेऊन आलेल्या आहेत. हे खर्चिक खूप असते आणि मुख्य म्हणजे याचा उपयोग होईल का नाही हा भाग वेगळाच. त्यामुळेच आपण घरी असणारी फळे आपल्या त्वचेवर लावली तर आपण सौंदर्य अधिक चांगले जपू शकतो. फळांमधून मिळणारे पोषक मूल्य नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला हानी सुद्धा पोहोचणार नाही. त्वचेसाठी फळांमधून खूप सारे चांगले घटक मिळतील. त्यामुळे आपण कोणती फळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले हे बघुया.
द्राक्षे
द्राक्षाचा वापर त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. द्राक्षामुळे त्वचेला एक आगळीच चकाकी लाभते. मुख्य म्हणजे द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी अधिक मात्रेत असल्यामुळे द्राक्षे आपल्या त्वचेसाठी केव्हाही बेस्ट. व्हिटॅमिन सी हे निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपली त्वचा सुरकुतते.
टोमॅटो किंवा टोमॅटोची पेस्ट
टोमॅटो आपल्या किचनमध्ये कायम असतोच. हे उत्तम आरोग्यदायी फळ आहे. त्वचेला अँटीऑक्सिडेंट बूस्ट आणण्यास टोमॅटोमुळे मदत होते. साधा कच्चा टोमॅटो रोज त्वचेवर चोळल्यास सुद्धा आपल्याला खूप आराम मिळतो.
चेरी
नितळ त्वचेसाठी चेरीचा उपयोग पाश्चात्य देशात खूप केला जातो. आपल्याकडे आता चेरी हे फळ मिळू लागले आहे. त्यामुळे चेरी खाऊनही आपल्याला अनेक पोषकद्रव्ये मिळतीलच. पण चेरी त्वचेवर लावल्याने चमकदार नितळ कांती प्राप्त होईल. चेरी देखील अँटिऑक्सिडेंटचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे.
(कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List