अकमल पाकिस्तान संघावर भडकला; म्हणाला, आयसीसीने आम्हाला आरसा दाखवला

अकमल पाकिस्तान संघावर भडकला; म्हणाला, आयसीसीने आम्हाला आरसा दाखवला

नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने विजेतेपदावर नाव कोरले आणि हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपली. मात्र यंदा टीम इंडियाच्या विजयी कामगिरीसोबतच पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीचीही जोरदार चर्चा चालू आहे. स्वतः यजमान देश असूनही पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. त्यामुळे संघाच्या नामुष्कीजनक कामगिरीवर पाकिस्तानी क्रिकेट चाहते प्रचंड नाराज असतानाच पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल याने जाहीरपणे संघावर टीका केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाली तेव्हा पाकिस्तानमधील मैदानांवर स्पर्धेत खेळणाऱ्या इतर देशांचे ध्वज स्टेडियममध्ये लावलेले असताना हिंदुस्थानचा ध्वज मात्र तिथे लावण्यात आला नव्हता. त्यावरून बरीच चर्चा झाल्याचे दिसून आले. मात्र, आता स्वतः यजमान असूनदेखील खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही पदाधिकारी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्याच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यासपीठावर नव्हता. त्यामुळे आयसीसीने यजमान पाकिस्तानलाच या कार्यक्रमातून हद्दपार केल्याची चर्चा रंगली आहे, त्यावरून आता कामरान अकमलने भूमिका स्पष्ट केली आहे. ही स्पर्धा संपल्यानंतर कुणीही पाकिस्तानने कशा प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले यावर बोलत नाहीये. जर आम्ही असे क्रिकेट खेळणार असू, तर आम्हाला अशीच वागणूक मिळणार, जर तुम्ही स्वतःसाठी खेळणार असाल, तर तुम्हाला आदर मिळणार नाही, असेही अकमलने नमूद केले.

बोर्डाने केली तक्रार

दरम्यान, अंतिम सामन्यानंतरच्या कार्यक्रमात पाकिस्तानला यजमान असूनही व्यासपीठावर प्रतिनिधित्व देण्यात आले नाही, याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डांने आयसीसीकडे केली आहे. सुमेर अहमद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व स्पर्धेचे संचालक होते. मात्र, त्यांना व्यासपीठावर बोलावण्यात आले नव्हते. या आक्षेपावर आयसीसीकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली, तरी पीटीआयने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने फायनान्शियल एक्स्प्रेसने आयसीसीच्या उच्चपदस्थांची भूमिका वृत्तामध्ये दिली आहे. जर पीसीबी ने नीट पाहिले, तर आयसीसीचे सीईओ जॉफ अॅलेरडाईस हेही व्यासपीठावर नव्हते. याचे कारण यासंदर्भांतले ठराविक शिष्टाचार हे होते, असे या उच्चपदस्थाने सांगितले आहे.

आयसीसीने आम्हाला बाहेरचा आरसा दाखवला – कामरान अकमल

व्यासपीठावर पाकिस्तानला जागा न देऊन आयसीसीने आम्हाला आरसा दाखवला, असे कामरान अकमल म्हणाला आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कामरान अकमलने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पाकिस्तानच्या कामगिरीवर भाष्य केले. या स्पर्धेचे पाकिस्तानमधील संचालक सुमेर हे अंतिम सामन्यासाठी उपस्थित होते. ते व्यासपीठावर येण्यासाठी उपलब्धही होते. पण तरीदेखील बक्षीस वितरण समारंभात त्यांना सहभागी करून घेतले गेले नाही का? कारण आम्ही त्या व्यासपीठावर असण्यासाठी पात्रच नाही आहोत. आम्ही चांगले क्रिकेट खेळतच नाही आहोत. त्यामुळे त्यांनी आम्हाला आरसा दाखवला आहे, असे अकमल म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल
Rashmika Mandanna New Mercedes Benz S450: काही महिन्यांत पुष्पा 2 आणि छावा सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन आणि विकी कौशल...
Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार
बदलापूरमध्ये होळी खेळण्यासाठी गेलेले चार तरुण उल्हास नदीत बुडाले, परिसरात हळहळ
मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम
Another Round… Another Round! मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू