अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एका व्यक्तीने भाविकांवर लोखंडी रॉडने केला हल्ला, 5 जण जखमी
अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात भाविकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. येथे एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने भाविकांवर हल्ला केला, त्यात 5 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखले आणि हल्लेखोराला अटक केली. आरोपीचे नाव जुल्फान, असं आहे. तो हरियाणाचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. याप्रकरणाची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरोपीने भाविकांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीसोबत रेकी केल्याचा आरोप आहे.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये दोन मंदिराचे सेवक आणि तीन भाविक आहेत. जखमींपैकी भटिंडा येथील एका शीख तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर अमृतसर येथील श्री गुरु रामदास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च येथे उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी भाविकांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली. त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. जुल्फान याने भाविकांवर हल्ला का केला, याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहे.
#WATCH | अमृतसर, पंजाब: कोतवाली SHO सरमेल सिंह ने कहा, “शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटी (SGPC) ने जुल्फान नामक व्यक्ति को पुलिस के हवाले किया है। स्वर्ण मंदिर परिसर में झड़प हुई और दोनों पक्षों के लोगों को चोटें आईं। SGPC कर्मी भी घायल हुए हैं। कानून के मुताबिक कार्रवाई की… https://t.co/wvQL1CHXqZ pic.twitter.com/GAp6k8biFq
— ANI_HindiNews (@AHindinews) March 14, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List