अत्याचार करणारा बसचालक गजाआड
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बस चालकाला कुरार पोलिसांनी अटक केली. त्याने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
पीडित मुलगी ही मालाड येथे राहते. त्याच परिसरात राहणारा तरुण हा त्या शाळेत बस चालक म्हणून काम करतो. त्याने गेल्या वर्षी मुलीशी मैत्री केली होती. तिला त्याने एका ठिकाणी नेले. तेथे नेऊन त्याने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले होते. तो प्रकार कोणाला सांगू नये म्हणून तो तिला वारंवार धमकी देत असायचा. तसेच ते फोटो व्हायरल करून असे तिला सांगायचा. त्यामुळे ती मुलगी घाबरली होती. अखेर तिने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्या चालकाला अटक केली. नुकतेच सायन येथे शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करणाऱया चालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे केली होती. शाळा प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. अखेर पोलिसांनी त्या शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात देखील गुन्हा नोंद केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List