Digestion – अन्नपचन नीट होण्यासाठी आपल्या आहारामध्ये या सुपरफूड्सचा समावेश करायलाच हवा!
रोजच्या धावपळीत गडबडीत आपण खरं तर केवळ मशीनप्रमाणे काम करत आहोत. त्यामुळेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्येही फार मोठे बदल झालेले आहेत. खाण्याच्या सवयीमुळे आपल्याला अन्न पचनाच्या समस्येलाही सामोरं जावं लागत आहे. अशावेळी जीभेला जे काही चवीला लागते ते आपण फक्त खातो, त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसून येतात. यामुळे बद्धकोष्ठता, गॅसची समस्या आणि पोटदुखी यासारख्या समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत तुमची पचनसंस्था चांगली असणे खूप महत्वाचे आहे. याकरता आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे.
आहारातील सुपरफुड्स
केळी
केळीमध्ये पेक्टिन नावाचा फायबर असतो, जो कार्बोहायड्रेट्सच्या पचनाची गती नियंत्रित करतो. केळी आतड्यांसाठी देखील चांगली मानली जाते. केळीमुळे आतड्यात आढळणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळते.
पुदिना
पुदिन्याचे सेवन पचनासाठी खूप फायदेशीर आहे. पुदिना अपचनाच्या समस्येपासून आराम देतो. पुदिना, सॅलड आणि फळांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो.
दही
पोटाच्या समस्यांसाठी दही भात हा सर्वात जुना घरगुती उपाय आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, ते आपल्या आतड्यांमधील बॅक्टेरिया संतुलित ठेवतात. यामुळे पचनाची कोणतीही समस्या उद्भवत नाही. तसेच, दही खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.
आले
आल्यामुळे पोटाच्या अनेक समस्या जसे की मळमळ, पोट फुगणे आणि अतिसार यापासून आराम मिळतो. आले खाण्यामुळे आपली पचनक्रिया सुलभ होते तसेच पोट फुगण्याचे प्रमाणही कमी होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List