Aamir Khan Girlfriend Gauri- साठाव्या वर्षी आमिर खान पुन्हा एकदा प्रेमात! ‘गौरी’सोबत रिश्ता कुबूल हैं…
आमिर खानने रीना दत्तासोबत घटस्फोट घेतल्यानंतर किरण राव आमिरच्या आयुष्यात आली. किरण आणि आमिर या दोघांची जोडी किमान काही काळ टिकेल, असे वाटत असतांनाच त्यांच्यात घटस्फोटही झाला. घटस्फोटानंतर आमिर खानच्या अफेअरच्या अफवा जोर धरू लागल्या. नुकतेच आमिरने ‘मिस्ट्री गर्ल’ गौरीसोबतच्या नात्याविषयी माध्यमांसमोर गुपित उघड केले आहे.
सध्याच्या घडीला आमिरच्या आयुष्यात असलेली प्रेयसी बंगळुरूची असून, दोघेही या नात्यामध्ये सुखी असल्याचे त्याने सर्वांसमक्ष म्हटले आहे. आमिरने गौरीशी त्याच्या कुटुंबाशीही ओळख करून दिली आहे. त्यामुळेच आमिर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार हे आता, शिक्कामोर्तब झालेले आहे.
गौरी आणि आमिर हे दोघेही त्यांच्या नात्याबाबत गंभीर असल्याचे, त्याने नुकतेच एका मुलाखतीमध्ये सांगीतले. आमिर खानने त्याच्या प्रेयसीची माध्यमांसोबतही ओळख करून दिली. परंतु आमिरसोबत असलेल्या गूढ महिलेचा कोणताही फोटो नाही कारण आमिर खानने पापाराझींना त्याच्या प्रेयसीचे फोटो काढू नये अशी विनंती केली होती.
13 मार्च रोजी आमिर खानने त्याचा प्री-बर्थडे मीडियासोबत साजरा केला. आता आमिरने साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. सध्याच्या घडीला आमिरचे चाहते त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल अंदाज लावत आहेत.
आमिरला त्याची पहिली पत्नी रीना दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुले आहेत. तब्बल 16 वर्षांच्या संसारानंतर 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो किरण राव यांच्या संपर्कात आला. त्यांचे नाते 2005 ते 2021 पर्यंत टिकले. आमिर खानला त्याच्या दुसऱ्या लग्नापासून एक मुलगा आहे, त्याचे नाव आझाद राव खान आहे. आमिर खानचे त्याच्या दोन्ही पत्नींशी चांगले संबंध असून, आता आमिर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा लग्नाच्या विचारात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List