Obesity Control: लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढतोय? ‘या’ ट्रिक्स करतील वजन कमी…..
गेल्या काही वर्षांत अगदी कमी वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढताना दिसतेय. लठ्ठपणा वाढल्यामुळे एक अहवाल खूप प्रसिद्ध झाला आहे. जागतिक स्थूलता अहवालामध्ये असे सांगितले आहे की गेल्या काही वर्षांपासून मोठ्यांपेक्षा लहान वयाच्या मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. आव्हालामध्ये याचे अनेक कारणं सांगितले आहेत. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या लठ्ठपणामुळे लहानमुलांमध्ये मधुमेहापासून आणि हृदयरोग यांच्या सारख्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणामुळे लहानमुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्यास त्यांची शारीरिक हालचाल कमी होते.
मुलांमधील मोबाईलचा वापर वाढलाय. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल होत नाही आणि वजन वाढते. त्यासोबतच आजकाल मुलं जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन करतात ज्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स जमा होतात आणि शरीरातील चरबी वाढते. वजन वाढल्यामुळे मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या समस्या वाढतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरातील मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण 1990 च्या तुलनेत 2024 मध्ये चौपट वाढण्याची अपेक्षा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे. यामुळे मुलांमध्ये टाइप-2 मधुमेह आणि हृदयरोगाचे रुग्णही वाढले आहेत. काही प्रकरणांमध्ये, हृदयरोगामुळे मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. लठ्ठपणामुळे मुलांमध्ये हार्मोनल असंतुलनासारख्या समस्या देखील दिसून आल्या आहेत. यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे मुलांची जीवनशैली बिघडली आहे. आता मुले मोबाईल आणि संगणकासमोर बसून जास्त वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांच्यात शारीरिक हालचालींचा अभाव असतो.
मुलांमध्ये जंक फूड खाण्याचा ट्रेंडही झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा अनुवंशिकतेमुळे देखील असू शकतो. काही प्रकरणांमध्ये, ताण आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्य समस्या देखील लठ्ठपणाला चालना देऊ शकतात. मुलांना खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. मुलांच्या आहारात पीठ, साखर आणि मीठ यांचे सेवन कमीत कमी करा. मुलांना विनाकारण फोन आणि लॅपटॉप वापरू देऊ नका. घरातील वातावरण चांगले ठेवा आणि मुलांना मानसिक ताण देऊ नका.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा….
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
जंक फूडचे सेवन करण्यापेक्षा घरचे सात्विक जेवण जेवा.
तेलकट पदार्थाचे सेवन टाळा ज्यामुळे वजन वाढणार नाही.
जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करण्यापेक्षा शरीरिक हालचाल करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List