सामना अग्रलेख – खट्याळ रंगोत्सव!

सामना अग्रलेख – खट्याळ रंगोत्सव!

सत्तेतून आलेला अहंकार व कारस्थानी विकृती यांची या होळीत राखरांगोळी झाली असेल काय? होळी व धुळवड हे मुळातच खट्याळ व अवखळ सण. दसरा-दिवाळीसारखे इतर सण ‘साजरे’ केले जातात, तर होळी व धुळवड ‘खेळली’ जाते, हा यांतील मुख्य फरक आहे. दुर्विचार सोडून सन्मार्गाचा स्वीकार करणे व स्वच्छ, शुद्ध सदाचरण अंगी बाणवणे हा खरेतर होळीच्या सणाचा मुख्य संदेश. गावोगावी पेटलेल्या होळ्यांमधून आपण हा संदेश अंगीकारला तरच खऱ्याअर्थाने आपण होलिकोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल.

अवखळ आणि मस्तीखोर म्हणता येईल, अशा होळी व धुळवड या सलग दोन दिवस येणाऱ्या सणाचा जल्लोष सर्वत्र सुरू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी सूर्यास्तापाठोपाठ महाराष्ट्रासह देशभरात होळी पेटली, मुंबई-पुण्यासारख्या महानगरांपासून राज्याच्या प्रत्येक भागात, शहरात व गाव-खेड्यांत होळीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या. होलिकोत्सवानंतर शुक्रवारी नेहमीच्याच जल्लोषात व पारंपारिक उत्साहात धुळवड अर्थात रंगोत्सव साजरा होईल. होळी म्हणजे अमंगल, अपवित्र, अभद्र व वाईट विचारांना तिलांजली देणारा सण, होलिकोत्सवासाठी लहान मुले व तरुणाई दोन दिवस आधीपासूनच जय्यत तयारीला लागतात. लाकूडफाटा गोळा करून तो उंच रचून ठेवण्यासाठी मुले मोठ्या हिरीरीने धडपड करतात. गावागावांत, चौकांत व खुल्या मैदानांवर गुरुवारी होळ्या पेटल्या. घरातील बच्चे कंपनींना सोबत घेऊन व लहान नातवंडांना खांद्यावर घेऊन पेटलेल्या होळीचे दर्शन घडवण्यात घरातील वडीलधारी मंडळीही तेवढ्याच उत्साहाने होलिकोत्सवात सहभागी झाली. एकीकडे पेटलेली होळी आणि दुसरीकडे बोंबाबोंब व शिमगा करण्याचा रिवाज यामुळे होळी व धुळवडीच्या सणाचे एक वेगळेच आकर्षण लहान मुलांना असते. मात्र मुलांबरोबरच घरातील महिला व आबालवृद्धही या सणाचा मनसोक्त व मनमुराद आनंद घेताना दिसतात. होळी व धुळवड आणि दसरा-दिवाळीसारखे इतर सण यांची तुलनाच होऊ शकत नाही. सगळे सण एकीकडे आणि

होळी व धुळवडीचा

धुमाकूळ एकीकडे असा सारा मस्तीचा माहोल असतो. इतर सणांच्या वेळी नव्या-कोऱ्या कपड्यांची खरेदी, टापटिप दिसणे वगैरेसाठी विशेष तयारी करावी लागते. तथापि, होळी व धुळवडीसाठी यापैकी काहीच करावे लागत नाही. या सणाची तयारीच वेगळी! ना छान दिसण्याची चिंता, ना नव्या कपड्यांची गरज, चेहऱ्यावरील रंगकामांमुळे व रंगी-बेरंगी पाण्याने ओल्या झालेल्या वस्त्रांनी जिथे ओळख पटण्याची शक्यता कमी, तिथे सुंदर दिसण्याची तसदी कोण कशाला घेईल? होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारी धुळवड म्हणजे मुळातच मस्तीचा खेळ. आपल्या मित्रमंडळींना नखशिखांत रंगवणे, ओले-कोरडे रंग फासणे, रंगीत पाण्याची आंघोळ घालणे व एकेकाला पकडून त्याच्या चेहऱ्यावर रंगकाम करणे, अशी मौजमस्ती धुळवडीला दुपारपर्यंत सुरू असते. ज्यांना रंग खेळायला आवडत नाही, अशी मंडळीही रंगलेल्या टोळ्यांचे इकडून तिकडे भटकणारे समूह खिडकीतून न्याहाळत दुरून का होईना या सणाचा आनंद घेतेच. होळीच्या पेटलेल्या लाकूडफाट्यात दुराचाराची व मनातील वाईट विचारांची राखरांगोळी व्हावी, असा संदेश हा सण देतो. मात्र या होळीत झाडांच्या फांद्यांबरोबर खरोखरीच जे-जे वाईट ते ते सारे नष्ट होते काय? दुराचरण, अविश्वास, दगाबाजी, षड्यंत्रे, विश्वासघाताने केलेली कारस्थाने व ज्या ताटात खाल्ले, त्याच ताटात

माती कालवण्याची

गलिच्छ मनोवृत्ती या साऱ्यांचे दहन या होळीत व्हायला हवे. ते झाले असेल काय? गैरमार्गाने मिळवलेली सत्ता, लोकशाहीची हत्या करून मिळवलेली पदे, सत्तेतून मिळवलेला अमर्याद पैसा आणि त्या पैशातूनच पुन्हा खरेदी केलेली सत्ता या साऱ्यांची होळी झाली तर तो खऱ्याअर्थाने होलिकोत्सव म्हणता येईल, सत्तेतून आलेला अहंकार व कारस्थानी विकृती यांची या होळीत राखरांगोळी झाली असेल काय? होळी व धुळवड हे मुळातच खट्याळ व अवखळ सण. दसरा-दिवाळीसारखे इतर सण ‘साजरे’ केले जातात, तर होळी व धुळवड ‘खेळली’ जाते, हा यांतील मुख्य फरक आहे. दुर्विचार सोडून सन्मार्गाचा स्वीकार करणे व स्वच्छ, शुद्ध सदाचरण अंगी बाणवणे हा खरेतर होळीच्या सणाचा मुख्य संदेश. गावोगावी पेटलेल्या होळ्यांमधून आपण हा संदेश अंगीकारला तरच खऱ्याअयनि आपण होलिकोत्सव साजरा केला, असे म्हणता येईल, आमच्या सरकारमध्ये हिंदूचे सण खुल्या वातावरणात साजरे होतील, असे आश्वासन ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते; मात्र त्याच सरकारने होळीच्या डिजेवर व गणेशमूर्तीच्या पीओपी मूर्तीवर बंदी आणली. होळी-धुळवडीच्या निमित्ताने रंगोत्सवाचा आनंद लुटतानाच जनतेने होंगी सरकारच्या नावानेही शिमगा करायलाच हवा!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल रश्मिका मंदानाने हवाच केली, ‘या’ लक्झरी कारमध्ये विमानतळावर दिसली, किंमत ऐकाल तर शॉक व्हाल
Rashmika Mandanna New Mercedes Benz S450: काही महिन्यांत पुष्पा 2 आणि छावा सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन आणि विकी कौशल...
Santosh Deshmukh Case – आरोपींनी फाशी होत नाही, तोपर्यंत एकही सण साजरा करणार नाही; मस्साजोगच्या ग्रामस्थांचा निर्धार
बदलापूरमध्ये होळी खेळण्यासाठी गेलेले चार तरुण उल्हास नदीत बुडाले, परिसरात हळहळ
मोठी बातमी! बदलापूरमध्ये उल्हास नदीत बुडून चार मुलांचा मृत्यू
‘राज ठाकरे भांग पिऊन बोलतात’; भाजप नेत्यानं उधळले रंग
World Sleep Day: चांगली झोप हवी असेल तर हे काम कराच, आजारी लोकांना देखील मिळेल आराम
Another Round… Another Round! मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू