राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले – सुप्रिया सुळे
राज्यात महिला अत्याचार आणि जनरल क्राईमचे प्रमाण वाढले, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे, हे केंद्र सरकारच्या डेटातून समोर आलं आहे. लोकसभेत खासदार म्हणून काम करण्याची आपण सगळ्यांनी मला संधी दिली. यामुळे केंद्र सरकारच्या होम कमिटीत काम करण्याचीही मला संधी मिळाली. यातच होम कमिटीचा सगळा जो डेटा समोर आला आहे, त्यातून असं कळतं की, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. अनेक राज्य असे आहेत, जिथे गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र महाराष्ट्रात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे. यातच देशात महिलांच्या विरोधात आणि जनरल क्राईम वाढला आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List