Benefits Of Chutney- पानात डाव्या बाजूला चटणी का असायला हवी? सविस्तर वाचा आरोग्याच्या दृष्टीने चटणीचे काय महत्त्व आहे
जेवणाचे ताट समोर आल्यावर, बऱ्याच घरांमध्ये आजही पानामध्ये डाव्या बाजूला चटणी कोशींबीर ही हमखास वाढली जाते. चटणी किंवा कोशींबीर खाण्याची परंपरा ही आपल्याकडे फार पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणूनच आहारात असणारी चमचाभर चटणी पानाच्या डाव्या बाजूची शोभा कायम वाढवत आलेली आहे. पानात वाढलेली ही चमचाभर चटणी आपल्याला आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका वठवत आलेली आहे. म्हणूनच फार पूर्वीपासूनच चटण्यांची आपल्या रोजच्या आहारामध्ये महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे.
पानात असलेल्या चटणीमुळे आपल्याला गॅसेसच्या समस्येपासून तर मुक्ती मिळतेच. शिवाय ही चटणी कोणत्या पद्धतीची आहे यावरही अनेक पोषक मूल्ये आपल्या शरीराला मिळत असतात. चमचाभर असलेली चटणी दिसायला जर कमी प्रमाणात दिसत असली तरी, आरोग्यासाठी फार महत्त्वाची मानली जाते. आजही अनेक घरांमध्ये भाजी बनली नसेल तर, चटणी भाकरी खाण्याची पद्धत आहे. यावरूनच चटणीचे आपल्या आहारातील महत्त्व लक्षात येईल.
ओली चटणी, सुकी चटणी अशा दोन पद्धतीने आपण चटण्या बनवू शकतो. ओल्या चटणीमध्ये खोबऱ्याची चटणी, पुदीना चटणी, टोमॅटो चटणी, कैरीची चटणी इ चटण्या बनवता येऊ शकतात. सुक्या चटणीमध्ये सुके खोबरे लसूण चटणी, शेंगदाणा चटणी, काराळ्याची चटणी, तीळाची चटणी इ. चटण्या आपल्याला बनवता येऊ शकतात.
पुदिना चटणीमुळे आपल्या पचनाच्या समस्येवर मात करता येते. पुदिन्यामुळे डोकं शांत आणि थंडही राहतं. हिरव्या मिरचीचा चटणीमधील समावेशामुळे आपल्याला मेंदूच्या फायद्यासाठी पोषकतत्वं मिळतात. कच्च्या कांद्याच्या चटणीमुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास खूप मदत होते. तसेच कांद्यामधून आपल्याला सल्फर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी सुद्धा मिळते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List