Another Round… Another Round! मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवलं, एका महिलेचा मृत्यू
गुजरातच्या वडोदरामध्ये मद्यधुंद तरुणाने अनेकांना उडवल्याची गंभीर घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर आरोपी मोठ मोठ्याने “Another Round… Another Round, असे ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना रात्री 12 च्या सुमारास करेलीबाग परिसरातील मुक्तानंद चौकात घडली आहे. आरोपी चालक रक्षित चौरासिया हा 20 वर्षांचा असून गाडी चालवताना दारुच्या नशेत होता. गाडीवरील नियंत्रन सुटल्याने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु अपघात झाल्यानंतर गाडीतून उतरल्यावर रक्षित मोठ मोठ्याने Another Round… Another Round अशा पद्धतीने ओरडत होता. रक्षित सोबत अन्य एक तरुण सुद्धा अपघातावेळी गाडीमध्ये सोबत होता. याप्रकरणी रक्षित चौरसियाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Trigger Warning
:
Horrific video have emerged from #Vadodara, #Gujarat , where an #OverSpeeding car hits a two-wheeler and run over people, causing one woman died and 4 other injured seriously, before #Holi festival.
On camera, #Drunk Driver who kills woman in Vadodara,… pic.twitter.com/s7EpeJ2GCp
— Surya Reddy (@jsuryareddy) March 14, 2025
रक्षित चौरासिया मुळ वाराणसीचा असून तो LLB चा विद्यार्थी असून पीजीमध्ये वास्तव्याला आहे. तसेच ज्या गाडीने त्याने अनेकांना उडवलं ती गाडी त्याचा मित्र मीत चौहान याची आहे. अपघात झाला तेव्हा तो सुद्धा गाडीमध्ये उपस्थित होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List