मणिपूरमध्ये कुकी समुदायाकडून बंद मागे, फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटला विरोध कायम
मणिपूरमध्ये कुकी जो परिषदेने बंद मागे घेतला आहे. 13मार्च 2025 सांयकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास हा निर्णय घेण्यात आला आहे. कुकी जो परिषदेने फार विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी या परिषदेने गृहमंत्रालयाने घोषित केलेले मुक्ती आंदोलनाला विरोध केला आहे.
कुकी जो परिषदेत म्हटलं की जो पर्यंत कुकी जो समुदायाला न्याय मिळत नाही तोवर राज्य सरकारच्या फ्री ट्रॅफिक मुव्हमेंटला आमचा विरोध असेल असेही परिषदेने म्हटले आहे.तसेच लालगौथांग सिंगसिट सहित सर्व शहिदांचा सन्मान झाला पाहिजे अशी मागणीही या कुकी जो परिषदेने केली असून कुकी समुदायासाठी वेगळी राजकीय व्यवस्था असावी असेही या परिषदेने म्हटले आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात आणि कुकी जो समुदायाला न्याय आणि सुरक्षा मिळावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List