अर्थवृत्त – पोलारीसचा करार, मॅग्माची भागीदारी
पोलारीस स्मार्ट मीटरिंग आणि थिंक गॅस यांच्यात 1 दशलक्ष स्मार्ट गॅस मीटर पुरवठ्याकरिता महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या वेळी सीईओ यशराज खेतान उपस्थित होते. हा करार देशाच्या स्मार्ट आणि अधिक कार्यक्षम ऊर्जा पर्यायांत अतिशय महत्त्वाचा मापदंड ठरला.
पेनीअरबाय एडिशन
शाखाविरहित बँकिंग व डिजिटल नेटवर्कने पेनीअरबाय विमेन फायनान्शियल इंडेक्स (पीडब्ल्यूएफआय) 2025च्या पाचव्या एडिशनचे अनावरण केले. या वेळी पेनीअरबायचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आनंद कुमार बजाज उपस्थित होते.
मॅग्माची भागीदारी
मॅग्मा जनरल इन्शुरन्स लिमिटेडने (मॅग्मा) ह्युंदाई इंडिया इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (एचआयआयबी) सोबत धोरणात्मक भागीदारी केली. या वेळी समीर समदानी आणि राजीव कुमारस्वामी उपस्थित होते.
एलईडी एक्स्पो
‘मेस्से फ्रँकफर्ट ट्रेड फेअर्स इंडिया’द्वारे आयोजित ‘एलईडी एक्स्पो मुंबई’चे आयोजन 3 ते 5 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. एलईडी एक्स्पोमध्ये 200हून अधिक प्रदर्शकांच्या 6 हजारहून अधिक उत्पादनांची पर्वणी मिळणार आहे.
एप्रिलमध्ये मुंबईत मीडिया एक्स्पो
‘मीडिया एक्स्पो मुंबई’च्या 54व्या आवृत्तीचे येत्या 10 ते 12 एप्रिल या कालावधीत मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातील नवनवीन उपक्रम प्रदर्शित करणाऱया 150हून अधिक प्रदर्शकांच्या प्रभावी श्रेणीसह या प्रदर्शनात छपाई यंत्रणा, शाई, नावीन्यपूर्ण उपयोजना, अद्ययावत साइनेजचे प्रकार आणि बरेच काही या ठिकाणी थेट उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त विविधता वाढवण्यासाठी एक्स्पोमध्ये 20हून अधिक नवीन सहभागींचा समावेश असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List