सलमान खान करणार पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न? भाईजानच्या जवळच्या मैत्रिणीने केला खुलासा
बॉलिवूडमधील मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. त्याच्या लग्नाचा प्रश्न हा आता जागतिक प्रश्न बनला आहे. आता एका अभिनेत्रीने सलमान खानच्या लग्नाविषयी वक्तव्य केले आहे. या अभिनेत्रीने पाकिस्तानी अभिनेत्रीला थेट सलमान खानची पत्नी आणि तिची वहिनी म्हटले आहे. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण? चला जाणून घेऊया…
सध्या सर्वजण अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट सिकंदरच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे आणि आता निर्माते त्याच्या पोस्ट प्रॉडक्शनवर काम करत आहेत. दरम्यान, ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतने सलमान खान आणि वहिनीसाठी स्वत: मुलगी निवडल्याचे सांगितले आहे. नुकताच राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सलमान आणि हानियाच्या जोडी विषयी बोलताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या क्रिकेट सामानच्यावेळी राखी दुबई येथे सामना पाहण्यासाठी केली होती. तेव्हा राखी सावंतने व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, “सलमान भाई, मी माझी वहिनी म्हणून हानियाची निवड केली आहे. सलमान माझा भाऊ आहे आणि हानिया पाकिस्तानची माझी वहिनी आहे.” राखी पुढे म्हणते, “हानिया आहे, तिने बॉलिवूडमध्ये यावे, सलमान खानसोबत काम करावे. देवाचे आभार, बॉलिवूडने ऐकले आहे… हानिया माझी प्रिय बहिण, मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”
यादरम्यान राखीने हानियाने दिलजीत दोसांझ आणि हनी सिंगसोबत काम केल्याबद्दल सांगितले. ती पुढे म्हणते, “आता तो दिवस दूर नाही हानिया जेव्हा तू सलमान खानसोबत हिरोईन म्हणून येशील. आणि मी सलमान खानशी बोलेन. तो दुबईला आला आहे आणि मी त्याला भेटणार आहे. मी तुझ्याबद्दल नक्की बोलेन.” मुर्तझा व्ह्यूज इन्स्टाग्राम पेजशी बोलताना राखीने सांगितले की, हानियाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून काम करावे अशी तिची इच्छा आहे.
बजरंगी भाईजान हा सिनेमा जसा भारत-पाकिस्तानवर होता तसाच एक सुंदर लव्हस्टोरी असलेला पाकिस्तान आणि भारतावर सिनेमा बनवायला हवा, असे राखी म्हणाली. इथून सलमान खान आणि तिथून माझी वहिनी हानिया, म्हणजे चित्रपटांमध्ये दिसतील. राखी पुढे म्हणते, “मी म्हणते, तू खऱ्या आयुष्यातही असं केलंस तर भाऊ, काही हरकत नाही… सलमान भाई, मी वहिनी म्हणून हानियाची निवड केली आहे. आता तू फक्त हानियाशीच लग्न करशील… जर सोमी अली तुझी मैत्रीण असू शकते तर हानिया तुझी पत्नी का होऊ शकत नाही.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List