IND vs PAK: ‘लाज वाटली पाहिजे’, पराभवाने दुःखी पाकिस्तान सेलिब्रिटी, विराट कोहलीला म्हणाले…
IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 242 धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पार केलं आणि 6 गडी राखून विजय मिळवला. दोन देशांमध्ये रंगलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष होतं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाचा दारुन पराभव केला. याचाच उत्साह आज संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहे. तर पाकिस्तानमध्ये सध्या नाराजीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.
भारताचा विजय आणि पाकिस्तानचा परावभ झाल्यानंतर शेजारील राष्ट्राच्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक केलं आहे. पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर पाक अभिनेता असद सिद्दीकी याला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दुःख व्यक्त केलंय.
‘पुन्हा मन लावयचं, पुन्हा मन मोडायचं… नेहमाचं झालं आहे आते हे… तसं म्हणायला गेलो तर आम्ही देखील पागल आहोत. विजयासाठी कोणती स्टॅटजी नाही, न जिंकण्याचा कोणता एटीट्यूड…, काय बोलायचं आता यावर. बऱ्याच काळानंतर, पाकिस्तानने आयसीसी इव्हेंट होस्ट केलं आणि पाकिस्तानच पहिला संघ आहे जो बाहेर पडला आहे. किती लाज वाटते…’ असं म्हणत असद सिद्दीकी याने खंत व्यक्त केली.
एवढंच नाही तर, असद सिद्दीकी याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचं कौतुक केलं आहे. ‘विराट दुसऱ्या देशातील लोकांचा देखील फेव्हरेट आहे… असं म्हणायला हरकत नाही…’ सध्या सर्वत्र असद सिद्दीकी याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री माया अली हिने देखील पाकिस्तान पराभूत झाल्यानंतर दुःख व्यक्त केलं. पण विराट कोहली याचं कौतुक केलं. पाकिस्तानी अभिनेत्री उसामा खान हिने देखील नाराजी व्यक्त केली आहे. उसामा म्हणाली, ‘मान्य आहे की जय – पराजयाचा खेळ आहे. पण निदान खेळा तरी…’ सध्या सोशल मीडियावर रविवारी रंगलेल्या सामन्याची चर्चा सुरू आहे. भारताचा विजय झाल्यामुळे समस्त भारतीयांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List