मी नेहमीच त्यांच्यासोबत..; बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

मी नेहमीच त्यांच्यासोबत..; बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांच्याबद्दल संजय दत्तचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता संजय दत्तला अनेकदा बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची अनेकदा भेट घेताला पाहिलं गेलंय. संजयने बाबा बागेश्वर यांच्याबद्दल अनेकदा आदर व्यक्त केला आहे. आता पुन्हा एकदा त्याने धीरेंद्र शास्त्री यांचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे मी नेहमीच बाबा बागेश्वर यांच्यासोबत राहीन, असं म्हटलंय. बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर संजय दत्तचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये संजय दत्त हा विविध सामाजिक कार्यांबद्दल बोलताना दिसून येतोय.

या व्हिडीओमध्ये संजय दत्त म्हणतो, “जय भोलेनाथ, जय सिया राम. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त 101 आदिवासी मुली आणि इतर समुदायातील 150 मुलींचा संसार थाटण्यात येणार आहे. हे सर्व काम मंदिराला देण्यात आलेल्या पैशांतून केलं जातंय. 23 फेब्रुवारी रोजी बागेश्वर धाम मेडिकल अँड रिसर्च सेंटरचं भूमीपूजन आहे. बाबा ज्याप्रकारे समाजातील प्रत्येक वर्गासाठी झटत आहेत.. मी नेहमी त्यांच्यासोबत आहे आणि पुढेही सोबत राहीन. तुम्हीसुद्धा या सर्व परोपकारी कामांमध्ये 23 आणि 26 फेब्रुवारी रोजी बाबा बागेश्वर यांना साथ द्यायला हवी.”

काही आठवड्यांपूर्वी संजय दत्तने बाबा बागेश्वर यांच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. बाबा बागेश्वर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत संजय दत्तने सांगितलं होतं की ते त्याच्या घरी आले होते. संजयने बाबा बागेश्वर यांचा उल्लेख ‘कुटुंब’ म्हणूनच केला. ‘श्री धीरेंद्र शास्त्रीजी बागेश्वर बाबा माझ्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला. माझ्यासाठी ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. गुरुजी आणि मी भावंडांसारखे, एका कुटुंबासारखे आहोत. जय भोलेनाथ’, असं त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. याच धामचे पुजारी आणि कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री प्रसिद्धीस आले आहेत. हेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा होय. बागेश्वर बाबा आपल्या दरबारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बोलावतात, तो व्यक्ती जवळ येईपर्यंत त्याचं नाव, पत्ता एका चिठ्ठीवर लिहून देतात. एवढंच नव्हे तर भर दरबारात बाबा त्या व्यक्तिच्या समस्याही सांगतात, असा दावा बागेश्वर बाबांचे भक्त करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले? बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?
भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यु इंडीया सहकारी बँकेवर नुकतेच कडक निर्बंध जाहीर केल्याने ठेवीदार हवालदील झाले आहेत. ठेवीदारांना त्यांच्या कोणत्याही खात्यातून...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…
इंग्लंडजवळील उत्तर समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांमध्ये टक्कर, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर
धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले
Ratnagiri News – भैयाजी जोशी यांच्यावर कारवाई करावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवेदनाद्वारे मागणी
सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका