महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग

महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ आणि ‘आई तुळजाभवानी’ या मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. प्रत्येक माणसात देव असतो त्याला नाकारू नका, हा माणुसकीची शिकवण देणारा संदेश यंदाच्या ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील महाशिवरात्री विशेष सप्ताहाचा महत्वाचा पैलू आहे. देवी पार्वती अक्कलकोटमध्ये एक सामान्य स्त्री म्हणून राहू लागते. रोजचं जीवन जगण्यासाठी मदत मागू लागते. तिला गावकऱ्यांनी मदत करावी म्हणून स्वामी त्यांना भेटून प्रेरित करत आहेत, पण महाशिवरात्रीच्या उत्सवात महादेवाकडून खूप काही मिळवण्याच्या धुंदीत असलेला प्रत्येक गावकरी फक्त उत्सव साजरा करण्यात मग्न आहे. त्या गरीब सामान्य स्त्रीला कोणीही मदत करत नाही.

माणसातली माणुसकी हरवलेली पाहून देवी पार्वती व्यथित होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ती सामान्य गरीब स्त्री, देवी पार्वतीमध्ये रूपांतरित होते. तिचा क्रोध अनावर होतो. तिचा राग शांत करण्यासाठी स्वामी महादेव रुपात प्रकटतात. आता वेळ आहे परिणामांची आणि आपण दोघांनी मिळून शिकवण देण्याची असे शिवपार्वती ठरवतात. इथे मंदिरातले शिवलिंग गायब होते. शिवलिंग परत मिळवण्याची माणुसकीचा मंत्र शिकवणारी दिव्य स्वामी लीला महाशिवरात्री भागात घडणार असून ती प्रत्येकाने आवर्जून अनुभवण्यासारखी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडली आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? याचा खुलासा हळूहळू मालिकेत होईलच. पण, महाशिवरात्रीचं औचित्य साधून मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच भगवान शंकरांचं पंचानन महादेव रूप भक्तांना पहायला मिळणार आहे. आई तुळजाभवानी अवतारात असलेल्या देवी पार्वतीला महादेवांच्या भवानीशंकर रूपाची ओळख पटते. बालगणेश, अशोकसुंदरी हे कुटुंब एकत्र येतं. देवी पार्वती महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवांची मनोभावे पूजा करते. देवी पार्वती म्हणते आई तुळजाभवानी अवतारात मी माझे वचन पूर्ण केलं आहे, आता महादेव तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. महादेवांनी देवींना कोणते वचन दिले, ते ‘पंचानन महादेव रूपात’ का प्रकट झाले, त्याचे प्रयोजन काय याची उत्तरे महाशिवरात्री विशेष भागात मिळणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार? मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार?
धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा...
‘अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मुळे शाळेतील विद्यार्थी बिघडतायत’; शिक्षिकेची तक्रार
पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी, प्रथमेश परब बायकोसह थायलंडला; थेट वाघाच्याच पुढ्यात बसून…
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मधुराणी प्रभुलकर दिसणार सिनेमात, स्वत: केला खुलासा
भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’
‘या’ कारणामुळे ‘हेरा फेरी ३’मधून कार्तिक आर्यन बाहेर; परेश रावल यांचा मोठा खुलासा
‘छावा’च्या समोरही अर्जुन कपूरच्या चित्रपटाचं नशीब जोरावर; करोडोंचा गल्ला