गणेशोत्सवात थर्माकोलचा वापर होत नाही; गणेशोत्सव समन्वय समितीचे पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर

गणेशोत्सवात थर्माकोलचा वापर होत नाही; गणेशोत्सव समन्वय समितीचे पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर

माघी गणेशोत्सवात पीओपीच्या गणेशमुर्तीच्या विसर्जनाचा मुद्दा गाजला होता. प्रशासनाने दबाव आणत पीओपीच्या मुर्ती विसर्जनाला विरोध केला होता. यावेळी गणेशभक्तांसमोर अखेर प्रशासनाला झिकावे लागले. आता पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी थर्माकोलचा वापर आणि पीओपी मुर्तींमुळे होत असलेल्या प्रायवरण हानीबाबत मत व्यक्त केले होते. त्याला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून उत्तर देण्यात आले आहे. याबाबत समितीने पत्रक प्रसिद्ध करत पंकजा मुंडे यांनी केलेले दावे खोडून काढले आहे.

गणेशोत्सवात प्लास्टिक आणि थर्माकोलचा भरमसाट वापर होतो. सर्वोच्च न्यायालयाने ‘पीओपी’ मूर्तीवर बंदी घातली आहे. ‘पीओपी’ ही माती आहे या मूर्तिकारांच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही. खरे तर ‘एक गाव एक गणपती’ मोहीम सर्वत्र राबवायला हवी. पण, आपल्याकडे कशाचेही राजकारण होते, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून पत्रकाद्वारे उत्तर देण्यात आले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पत्रकात म्हटले आहे की, माननिय पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री, महोदया, आपण पर्यावरणाबाबत आपण जी भूमिका मांडली आहेत, त्याबाबत आपल्या निदर्शनास आणण्यात येथे की, गणेशोत्सवात प्लास्टिक व थर्माकोल चा भरमसाट वापर होतो. या मताशी आम्ही सहमत नाही. चार वर्षापूर्वी माननिय उच्च न्यायालयाने थर्माकोलबाबत निर्णय दिल्यानंतर गणेशोत्सवात थर्माकोलवर गणेश भक्त तसेच गणेश मंडळाकडून त्वरित न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. गणेशोत्सवात मुंबईत दर्शनाच्या निमित्ताने फेरफटका मारल्यास आपणास थर्माकोल दृष्टपतास येणार नाही. प्लास्टिकचा तर वापर केला जात नाही. हो जर आपले म्हणणे असे असेल की गणेशोत्सवात प्लास्टिक व थर्माकोलचा वापर होत असेल तर आपल्या निदर्शनास आणण्यात येथे की आपल्या विभागाकडून वर्षभरात अनेक व्यवसायाकडून जो सर्रास वापर होत आहे त्या बाबत आपला विभाग काय करतो, असा सवालही विचारण्यात आला आहे.

आजपर्यंत किती व्यावसायिक व उद्योगधंद्यावर कारवाही झाली? पीओपी मूर्तीची बाब न्यायप्रविष्ट असल्याने तसेच हा विषय मूर्तिकारांच्या कक्षेत येत असल्याने त्याचे उत्तर आपणास मूर्तिकारांकडून मिळेलच. राहिलेला दुसरा मुद्दा एक गाव एक गणपती बाबत बोलायचे झाल्यास आपणास विधितच असेल की, महाराष्ट्र सार्वजनिक न्यास कायदा 1950 अन्वये मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही नोंदणीकृत आहे व त्यात दिलेल्या तरतुदींचे मुंबईतील गणेश मंडळे पालन करीत आहेत.

मुंबईतील गणेश मंडळे ही 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षे कार्यरत आहे. मुंबईतील वेगवेगळ्या विभागात ही मंडळे असून ती अधिकृत आणि नोंदणीकृत आहेत. आपण एक गाव एक गणपती बाबत बोलत असाल तर मुंबईमधे हे शक्य नाही. गावातील विषय हा गावापुरता मर्यादित ठेवा. शहरासाठी ते लागू होणारं नाही. कायदे हे आपणाकडून मंजूर होत असतात. त्याची अंमलबजावणी मंडळे करत असतात. मंडळे हे वेगवेगळ्या मुंबईतील विभागात कार्यरत असतात. त्यांच्याकडून वर्षभर सामाजिक उपक्रम त्याच प्रमाणे धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. राज्य अथवा देशावर नैसर्गिक आपत्ती असो किंवा अन्य मार्गाने आलेल्या संकटावेळी हिच मंडळे आर्थिक तसेच प्रत्यक्ष जाऊन मदत करीत असतात. असेच वक्तव्य या पूर्वी अनेक वेळा राज्यकर्ते करत असतात परंतू कायदेशीर असलेल्या मंडळांना एक गाव एक गणपती मुंबई शहरात तरी लागू होणारं नाही.

मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती आपण करून घेतल्यास बरे होईल, असे या पत्रकता म्हटले असून त्यावर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चॅम्पियन रोहित शर्माचं मुंबईत जंगी स्वागत, विमानतळावर चाहत्यांची जमली गर्दी चॅम्पियन रोहित शर्माचं मुंबईत जंगी स्वागत, विमानतळावर चाहत्यांची जमली गर्दी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो रोहित...
एलोन मस्कचे X दिवसभरात तिसऱ्यांदा ठप्प, युजर्सने नोंदवल्या तक्रारी
बुडीत बँकांच्या पाच लाखांहून अधिक ठेवी असलेल्यांवर आता दुहेरी संकट, पाहा काय घडले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…
इंग्लंडजवळील उत्तर समुद्रात तेलवाहू जहाज आणि मालवाहू जहाजांमध्ये टक्कर, दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू
यंदा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का नाही घातलं? अजित पवार यांनी दिले उत्तर
धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घेताना अजित पवार चुकले