भारताच्या विजयानंतर विराटनं गळ्यातील चैन काढली अन् त्यात असलेल्या अंगठीला किस केलं, काय आहे त्यामागचं सिक्रेट?
विराट कोहलीनं दुबईतील स्टेडिअममध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. विराटने शानदार शतक तर झळकावलंच पण त्यासोबत भारताला या स्पर्धेतला दुसरा विजयही मिळवून दिला. या विजयानंतर टीम इंडियाचंतर कौतुक होतच आहे पण सोबतच विराटचंही तेवढंच कौतुक होताना दिसत आहे.
दरम्यान भारताच्या विजयानंतर विराटच्या बाबतीत जे चित्र मैदानावर नेहमी दिसत तेच यावेळेसही दिसलं त्याने मैदानावरून लगेच पत्नी अनुष्का शर्मा हिला व्हिडीओ कॉल केला आणि हा विजयचा आनंद शेअर केला. पण त्याआधी देखील विराटनं केलेल्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गळ्यातील चैन काढली आणि त्यात असलेल्या अंगठीला किस केलं
भारताने ट्रॉफी जिंकताच विराटने त्याच्या गळ्यातील चैन काढली आणि त्यात असलेल्या अंगठीला किस केलं. हे चित्रही बऱ्याचदा मैदानावर पाहायला मिळालं आहे. दुबईच्या मैदानावर भारताने पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धूळ चारत विजय मिळवला. या विजयाचे श्रेय भारतीय माजी कर्णधार विराट कोहलीला जातं. सामना संपताना कोहलीने आपलं शतक साजरं केलं. दुबईचे स्टेडियम ‘भारत’ आणि ‘विराट’ च्या नावाच्या घोषणांनी दणाणून सोडलं.
अंगठीचं सिक्रेट काय?
शतक पूर्ण होताच कोहलीने नेहमीप्रमाणे आकाशाकडे बॅट उंचावत देवाचे आणि चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर त्याने गळ्यातील लॉकेट टीशर्टच्या बाहेर काढलं आणि त्यातील अंगठीला किस केलं. हे पाहून सर्वांनाच कोहलीच्या भावनांचा अंदाज आला. हे चित्र बऱ्याचदा मैदानावर पाहिलं गेलं आहे. अनेकांना हा प्रश्नही पडायचा की नेमकं या अंगठी मागील रहस्य काय आहे. तर ही अंगठी पत्नी अनुष्का शर्माची आहे. त्या अंगठीला तो त्याच्या आयुष्यातील लक मानतो. त्यामुळे ती अंगठी त्याच्या गळ्यातील चैनमध्ये नेहमीच पाहिली गेली आहे.
फोटोवर रेड हार्ट
विराटच्या कारकिर्दीतील प्रत्येक चढ-उतारात अनुष्का त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. कोहलीच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये देखील तिने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले.
त्यामुळेच विराटने त्याच्या या शानदार शतकाचे आणि विजयाचे श्रेय तो अनुष्काला देतो. भारताच्या विजयानंतर अनुष्काने इंस्टाग्रामवर कोहलीचा फोटो शेअर करत त्याचे कौतुकही केलं. या फोटोवर तिने रेड हार्ट आणि दोन हात जोडलेल्या इमोजी लावून आपलं प्रेमही व्यक्त केलं.
विराटनं पुन्हा एकदा चाहत्यांचा विश्वास राखला
विराट आणि अनुष्का जेव्हा डेट करत होते तेव्हा अनुष्का अनेकदा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असायची. जेव्हा जेव्हा कोहलीची मैदानावर खेळ चालायचा नाही तेव्हा अनुष्काला अनेक वेळा ट्रोल देखील करण्यात आले होतं.जसं की, 2015 च्या विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर तर कोहलीवर प्रचंड टीका झाली होती.
मात्र, त्यावेळेसही अनुष्का आणि विराटने याकडे दुर्लक्ष करत पुढचा खेळ कसा चांगला होईल याकडेच लक्ष दिल होतं.दरम्यान यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावून कोहलीने पुन्हा एकदा त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देऊन चाहत्यांचा त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List