लग्न, घटस्फोट, कुटुंबावर कंगनाचं लक्षवेधी वक्तव्य, नाव न घेता कोणावर साधला निशाणा
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना यांनी लग्न, घटस्फोट, कुटुंब आणि भारतीय संस्कृतीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगना यांनी स्वतःचं परखड मत व्यक्त केलं आहे. नाव न घेता कंगना यांनी अभिनेत्री सान्या मल्होत्रा स्टारर ‘मिसेज’ सिनेमावर निशाणा साधला आहे. ‘मिसेज’ सिनेमाचं अनेकांनी समर्थन केलं आहे तर, अनेकांनी टीका केली आहे. आता कंगना यांनी देखील सिनेमाबद्दल स्वतःचं मत मांडलं.
कंगना राणौत म्हणाली, ‘मी लहानपणापासून अशी महिला कधीच पाहिली नाही, जी स्वतःच्या घरावर हक्क गाजवत नाही. सर्वांना सांगते कधी जेवायचं आहे, कधी झोपायचं आहे, एवढंच नाही तर, महिला त्यांच्या नवऱ्यांकडून पैशांचा हिशोब देखील मागताना मी पाहिल्या आहेत. जेव्हा नवरा बाहेर मित्रांसोबत जातो आणि दारू पितो भांडणं तेव्हाच होतात. लहान असताना वडील जेव्हा आम्हाला बाहेर जेवायला न्यायचे तेव्हा आमची आई रागवायची. कारण आमच्यासाठी जेवण बनवायला तिला आवडायचं…’
‘महिला अनेक गोष्टी कंट्रोल करू शकतात. कुटुंबातील महिला आजी, आई, काकी घरातील खऱ्या राण्या आहेत आणि आपल्याला त्यांच्या सारखं होता आलं पाहिजे. एक गोष्ट मान्य करते, महिलांचा अपमान होतो. पण भारतीय कुटुंबाना चुकीच्या पद्धतीने दाखवणं आता बंद करायला हवं आणि वृद्ध व्यक्तींबद्दल देखील वाईट दाखवणं बंद केलं पाहिजे.’
‘घर सांभाळणाऱ्या महिलांची तुलना नोकरी करण्याऱ्या महिलांसोबत करणं बंद केलं पाहिजे. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आणि ओळख निर्माण करण्यासाठी लग्न करु नये. लग्न म्हणजे एक जबाबदारी आहे.’ धार्मिक ग्रंथांचा आधार घेत कंगना म्हणाल्या, ‘पूर्वीचे लोकं कोणतेच प्रश्न उपस्थित न करता घरातील वद्धांचा सांभाळ करत होते. फक्त स्वतःचं कर्तव्य ते बजावत होते. त्यामुळे आता घटस्फोटाचं समर्थन करु नका. नव्या पिढीला वृद्ध व्यक्तींना आश्रमात आणि मुलं जन्माला न घालण्यासाठी प्रेरित करु नका…’ असं देखील कंगना म्हणाल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List