‘छावा’ सिनेमाला रविवारी बसला मोठा फटका, बॉक्स ऑफिसवर का मंदावला सिनेमाच्या कमाईचा वेग?
Chhaava Box Office Collection Day 10: 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘छावा’ सिनेमा आता बॉक्स ऑफिसच्या ‘सिंहासना’वर बसला आहे. प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं असून. चाहत्यांनी देखील अभिनेता विकी कौशल याचं कौतुक केलं आहे. ‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम रचताना दिसत आहे. तर सिनेमाने अनेक हीट सिनेमांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत. सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 326 कोटी 75 लाख रुपयांची कमाई केली आहे.
सलग दहा दिवस ‘छावा’ सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर आणि चाहत्यांमध्ये बोलबाला दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारलेला ‘छावा’ सिनेमा पहिल्या दिवसापासून चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सिनेमाची कमाई चढत्या क्रमावर असताना, रविवारी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावलेला दिसला. शनिवारच्या तुलनेत रविवारी सिनेमाने कमी कमाई केली आहे.
रोज 30 कोटीचा टप्पा पार करणाऱ्या ‘छावा’ सिनेमाने शनिवारी 44 कोटींचा गल्ला जमावला. तर रविवारी कमाईचा वेग मंदावलेला दिसला. शनिवारच्या तुलनेत रविवारी सिनेमाने कमी कमाई केली. रविवारी सिनेमाने फक्त 40 कोटींचा गल्ला जमा केला. ‘छावा’ सिनेमाने आतापर्यंत 326.75 रुपयांची कमाई केली आहे.
का कमी झाला ‘छावा’ सिनेमाच्या कमाईचा आकडा?
शनिवारच्या तुलनेत रविवारी सिनेमाने कमी कमाई झाल्याचं चित्र समोर येत आहे. रविवारी भारत विरूद्ध पाकिस्तान सामना असल्यामुळे ‘छावा’ सिनेमाच्या कमाईत घट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढंच नाही तर, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर रात्रीच्या शोच्या प्रेक्षकांना पसंती दर्शवली. पण आता दुपारी आणि संध्याकाळी सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी होत आहे.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, जवळपास 130 कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेला सिनेमाने 300 कोटींचा गल्ला पार केला आहे. सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकरण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने त्यांच्या पत्नी यसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे.
सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना आणि विनीत कुमार यांनी साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अक्षय खन्ना याने औरंदजेबाची भूमिका साकारली आहे. तर विनीत कुमार याने कवी कलश यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List