अल्लू अर्जून कैदी नंबर…, रात्रभर जेलच्या कोठडीत जमिनीवर झोपला आणि…
Allu Arjun Arrest: संध्या थिएटर चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आलेला तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला. अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने अभिनेत्याल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर अल्लू अर्जुन याला चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं. अखेर अल्लू अर्जुनने त्याचे वकील अशोक रेड्डी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला, तेथून अभिनेत्याला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मिळाला.
सांगायचं झालं तर, तेलंगणा उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतरही कागदोपत्री प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे अल्लू अर्जुनला एक तुरुंगात रात्र काढावी लागली. तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन याचा कैदी क्रमांक 7679 होता. अभिनेता संपूर्ण रात्र काही न खाता-पीता जमीनीवर झोपलेला होता. अंडरट्रायल म्हणून पोलिसांनी त्याला मंजिरा बॅरेकमधील वर्ग-1च्या खोलीत ठेवलं होतं. अल्लू अर्जुनची सर्व माहिती कारागृहातील रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली होती.
संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचं निधन…
संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ सिनेमासाठी प्रीमियर ठेवलं होतं. जेथे अभिनेता अल्लू अर्जुन देखील पोहोचला होता. तेव्हा अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. याचदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचं निधन झालं. याच प्रकरणी अभिनेत्याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
जे काही झालं त्यासाठी माफी मागतो – अल्लू अर्जुन
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन याने माध्यमांसोबत संवाद साधला… अभिनेता म्हणाला, ‘काळजी करण्याचं काही कारण नाही. जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. अपघात अनावधानाने झाला. मृत महिलेच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो. कायदेशीर सर्वकाही सुरु आहे, तर यावर मी वक्तव्य करणार नाही. लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे आज मी याठिकाणी आहे… मी सर्वांचे आभार व्यक्त करतो… मी पोलिसांना सहकार्य करेन.’ असं अभिनेता म्हणाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List