करोडोंची मालकीण, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे फ्लॉप अन् घटस्फोटीत अभिनेत्यावर प्रेम; लग्नानंतर अभिनेत्रीच्या संपत्तीत दुप्पट वाढ
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कमी वेळात यश आणि प्रसिद्धी मिळवली असेल. त्यातील एक नाव असं आहे की या अभिनेत्रीने फिल्म फिल्म इंडस्ट्रीमध्ये फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. एवढचं नाही तर तिची करोडोंची संपत्ती आहे.
कमी वयात प्रचंड यश मिळवलेल्या या अभिनेत्रीचे एका फ्लॉप आणि घटस्फोटीत असलेल्या अभिनेत्यावर प्रेम जडल्याने त्याच्याशी लग्न करून त्याची दुसरी पत्नी होणं पसंत केलं आहे.
ही अभिनेत्री आहे शोभिता धुलिपाला. शोभिताने 2016 मध्ये 'रमन राघव 2.0' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेत्रीने हिंदीसह अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत.
'मेड इन हेवन' ही वेब सीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजने शोभिता धुलिपालाला देशभरात लोकप्रियता मिळाली अन् तिचा चाहतावर्गही वाढतच गेला.
शोभिता धुलिपालाने 2016 पासून आतापर्यंत 13 चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच तिने 3 वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे.
शोभिताने 'मंकी मॅन' या चित्रपटाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचं आणि तिच्या अभिनयाचंही तेवढच कौतुक झालं होतं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List