लोकल ट्रेन लेट.. मग बोटीने कामाला जा, मुंबईत धावणार वॉटर टॅक्सी, कोच्ची करणार मदत
मुंबई्च्या लोकल ट्रेनने कामाला जाण्याचा अवघड टास्क केवळ मुंबईकरांना ठावूक असतो.कारण मुंबईतील लोकल ट्रेन एक मिनिट जरी लेट झाली तर घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचे सारे गणित बिघडतं…त्यावर आता पर्याय जल वाहतूकीचा आहे. मुंबईत जलवाहतूकीचे मार्ग सुरु झाले तर मुंबईकरांना पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुंबईत जल मेट्रो योजना राबविण्याची घोषणा महाराष्ट्राचे मत्स्य पालन आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मुंबईत आता जलवाहतूक जर खात्रीशीर आणि सुरक्षित झाली तर मुंबईकरांच्या उपनगरी लोकलचा भार थोडा तरी कमी होईल. यासाठी कोच्ची वॉटर टॅक्सीचा आदर्श घेण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेर या संदर्भात एक डीपीआर तयार करण्यात आला आहे.
50-50 टक्के सहभागातून योजना राबविणार
मुंबई जल मेट्रो योजना लागू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या दरम्यान 50-50 टक्के भागीदारीत ही योजना राबविली जाणार आहे. मुंबई सात बेटांपासून बनविली आहे. या योजनेत सर्व जलमार्गांना सक्रीय केले जाणार आहे. रस्ते मार्ग आणि उपनगरीय लोकल सेवेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे शहरी भागातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा तर होईलच शिवाय मुंबईच्या पर्यटन क्षमतेलाही चालना मिळणार आहे.. कोच्ची वॉटर मेट्रो प्रकल्प महाराष्ट्र सरकारला सहाय्यभूत ठरणार आहे.. या प्रकल्पांतर्गत, मुंबई महानगर प्रदेशाच्या ( एमएमआर ) विविध भागांना जोडण्यासाठी इलेक्ट्रीक बॅटरीवर चालणाऱ्या स्पीड बोटी या जलमार्गावर धावणार आहेत.
२१ प्रस्तावित स्थानकांची यादी
वॉटर मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण २१ प्रस्तावित स्थानकांची यादी तयार केली आहे, यात वैतरणा नदीजवळील स्थानके, वसई, ठाणे, मनोरी, पनवेल आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांचा समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यात वॉटर मेट्रो सेवा सुरू केली जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात रो-रो (रोल ऑन-रोल ऑफ) सेवेत वाढ केली जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List