‘त्यांनी विद्यार्थ्यांना फोडाफोडीची अन् गद्दारीची…’; गुलाबराव पाटलांवर दानवेंचा हल्लाबोल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
आम्ही जसे पक्षातील कार्यकर्ते फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडा असं वक्तव्य शाळेतील पटसंख्या वाढवण्यासंदर्भात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं, पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी जोरदा टोला लगावला आहे. मला वाटतं की गद्दारीची आणि फोडाफाडीची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावू नये, असा टोला यावेळी अंबादास दानवे यांनी मंत्री पाटील यांना लगावला आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीवेळी त्यांनी आपल्या फाईलींवर अर्थ खातं सह्या करत नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केली. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सगळे मिळूनच या गोष्टी करत असतात, जशा यांच्या फाईल अडवल्या जातात तशा त्यांचीही काही गोष्टी अडवल्या जातात. मला असं वाटतं हे राज्याच्या मंत्रिमंडळातील मोठे नेतेच करत असतात. ज्याच्यात दम आहे त्याच्या फाईली बरोबर मंजूर होतात, असं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सध्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांच्या कर्जमाफीसंदर्भातील वक्तव्यांमुळे कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे सरकारने पूर्ण केलं पाहिजे.आता फक्त शेतकरी आवाज उठवत आहेत, येणाऱ्या काळात सर्व पक्ष मिळून जनआंदोलन या महाराष्ट्रात उभा करू असा इशाराही यावेळी दानवे यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List