‘काश्मीर आमचं आहे आम्ही येणारच…’ पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेता थेट काश्मीरमध्ये, दाखवली तिथली परिस्थिती
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगभरात संतप्त वातावरण आहे. या घटनेत 27 पर्यटकांची हत्या करण्यात आली तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले. या थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे आता काश्मीरमध्ये शुकशुकाट पाहायाला मिळत आहे. या घटनेवर सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच राग व्यक्त केला आहे. तर या सर्व घटनेचा परिणाम काश्मीरच्या पर्यटनावरही पडला आहे. तिथले पर्यटन ठप्प झालं आहे. लोकांच्या मनात तिथे जाण्यासाठी भीतीचं वातावरण आहे.
अतुल कुलकर्णी थेट काश्मीरला
तिच भीती घालवण्यासाठी एक अभिनेता थेट काश्मीरला गेला आहे. होय, राठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी काश्मीरला गेले आहेत. हल्ल्याच्या आठवडाभरानंतरच अतुल कुलकर्णी यांनी खरोखरचं धाडस दाखवत काश्मीरला जाऊन लोकांच्या मनातील भीती काढण्याचा प्रयत्न केला. लोकांना हिंमत देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
अतुल कुलकर्णींची पोस्ट व्हायरल
एवढंच नाही तर अतुल कुलकर्णी पहलगाम हल्ल्यावरून परखड मतही मांडलं आहे. त्यांनी काश्मीरला जाताना विमान प्रवासापासून ते तिथे पोहोचल्यावर तिथल्या परिस्थितीचे सर्व अपडेट लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी हे सर्व फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अतुल कुलकर्णीने X वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी विमानाच्या तिकिटांचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टला त्याने कॅप्शन दिले आहे, ‘मुंबई ते श्रीनगर, काश्मीर.’
चलिए जी कश्मीर चलें
सिंधु, झेलम किनार चलें
कश्मीरियत की बात सुनें
कश्मीरियों की बात बनें
चलिए जी, कश्मीर चलें pic.twitter.com/eVpJSVJGTy— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
अभिनेत्याने काश्मीरला जाताना विमान प्रवासाचे फोटो
त्यानंतर अतुल कुलकर्णीने फ्लाइटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे, ‘फ्लाइट पूर्ण रिकामी आहे आणि आपल्याला ही पुन्हा भरायची आहे आणि दहशतवादाला हरवायचं आहे.’ त्यामुळे काश्मीरला जाण्याची भीती घालवण्यासाठी अतुल कुलकर्णीने हे पाऊल उचलल्याचे दिसून येतं आहे.
#ChaloKashmir #Feet_in_Kashmir #Kashmiriyat #love_compassion #DefeatTerror pic.twitter.com/nOe7zG8FWj
— atul kulkarni (@atul_kulkarni) April 27, 2025
“काश्मीर आमचं आहे. आम्ही येणारच…”
तसेच काश्मीरला पोहोचल्यावर TV9 मराठीसोबत बोलताना त्यांनी म्हटंल की,” त्यांनी पर्यटकांवर हल्ला करून काश्मीरला येऊ नका म्हटलं काश्मीर आमचं आहे इथे प्रत्येक देशवासीय येणार हे सांगायला मी आलो आहे. तुम्ही (दहशतवादी) कोण सांगणारे? आम्ही इथं येऊ नको म्हणून , तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका… आम्ही येणारच. माझं कुठलंही शूटिंग इथं नाही. मला कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीने किंवा हॉटेल्सने पैसे देऊन बोलावलं नाही. काश्मीरमध्ये देशभरातून आलेले पर्यटक एकमेकांशी जोडले जातात, म्हणूनच हा हल्ला करून तुम्ही येऊ नका हा संदेश देण्यात आला. पण आपल्याला त्यांना आपल्या कृतीतून आणि विचारांतून हरवावंच लागेल” असं म्हणत अभिनेत्याने सर्वांना एक हिंमत देण्याचा प्रयत्न केला आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरला जायला लोक घाबरत असताना त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे सर्वच थक्क झालेत. त्यांच्या या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत असून त्यांच्या धाडसाचे कौतुकही केलं जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List