नेहा कक्करसोबत बहिणीने सर्व संबंध तोडले; पोस्ट वाचून चाहत्यांना बसला धक्का!
गायिका सोनू कक्करने शनिवारी सोशल मीडियावर एक घोषणा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्कर यांच्याशी सर्व संबंध तोडत असल्याचं तिने या पोस्टद्वारे जाहीर केलं. परंतु काही वेळानंतर तिने ते पोस्ट डिलिट केलं. सोनू, नेहा आणि टोनी हे तिघे प्रसिद्ध गायक आहेत. कलाविश्वात त्यांचं मोठं नाव आहे. त्यामुळे अचानक सोनूने तिच्या भावंडांसोबत सर्व संबंध का तोडले, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ‘तुम्हाला सर्वांना कळवताना मला खूप दु:ख होत आहे की मी आता दोन प्रतिभावान सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही’, अशी तिने पोस्ट लिहिली आहे. सोनूने सोशल मीडियावरील तिची ही पोस्ट डिलिट केली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. बहीण-भावांमध्ये नेमकं काय बिनसलंय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
सोनू कक्करची पोस्ट-
‘तुम्हाला कळवताना खूप दु:ख होतंय की मी आता दोन प्रतिभावान आणि सुपरस्टार टोनी कक्कर, नेहा कक्कर यांची बहीण नाही. माझा हा निर्णय अत्यंत भावनिक वेदनांमधून आला आहे आणि आज मी खरोखरंच निराश आहे’, अशा शब्दांत सोनूने भावना व्यक्त केल्या आहेत. 9 एप्रिल रोज टोनीने त्याचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्येही सोनू कुठेच दिसली नव्हती. काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचाही अंदाज व्यक्त केला आहे. तर काहींनी सोनूचा अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय.
कक्कर कुटुंबातील तिघेही म्युझिक इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. सोनू अनेक गायनाच्या रिअॅलिटी शोजमध्ये परीक्षक म्हणून उपस्थित राहिली आहे. त्याचसोबत तिने कोक स्टुडिओ इंडियासोबतही काम केलंय. नेहा आणि टोनी या दोघांसोबत तिने अनेक गाणी गायली आहेत. टोनीने संगीतबद्ध केलेल्या अनेक गाण्यांना सोनूने आवाज दिला आहे. इतकंच नव्हे तर या तिघांनी अनेकदा विविध मंचांवर एकत्र परफॉर्मसुद्धा केलं आहे. भावनिक वेदनेतून सोनूने हा निर्णय घेतल्याचं समजत असलं तरी त्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. तिच्या या पोस्टवर अद्याप नेहा कक्कर किंवा टोनी कक्करने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List