कानफटातच लगावेन… Homosexuality बाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; पारा पाहून सन्नाटा
प्रसिद्ध अभिनेत्री रकूल प्रीत सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आताही ती चर्चेत आलीय. रकूलने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केला होती. 2011मध्ये तिने मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये भाग घेतला होता. त्यात तिला यश आलं नाही. या ब्यूटी पेजेंटमधील अभिनेत्रीचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. रकूलचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओत रकूलला मिस इंडियाच्या काळात Homosexuality बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रकूलने असं काही उत्तर दिलं की ते ऐकून जजच नव्हे तर ऑडियन्स सुद्धा हैराण झाले.
मिस इंडिया 2011च्या जज पॅनलमध्ये फरदीन खानन होता. फरदीनने रकूलला एक सवाल केला होता. एखाद्या दिवशी तुझा मुलगा गे असल्याचं तुला कळलं तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? असा सवाल तिला करण्यात आला होता. त्यावर बोलताना रकूल आधी थोडी दचकली. काय बोलावं तिला कळेना. पण नंतर तिने जे उत्तर दिलं त्यावर काय बोलावं हे जजच नव्हे तर ऑडियन्सलाही कळेनासं झालं होतं. काही वेळ तर कार्यक्रमाच्या ठिकाणी सन्नाटा पसरला होता.
जजला बसला शॉक
ठिक आहे. इमानादीरने सांगायचं तर माझा मुलगा समलैंगिक असल्याचं कळलं तर मला आश्चर्य वाटेल. कदाचित मी त्याच्या कानफटात लगावेल. पण मला वाटतं आपली सेक्स्युअलिटी निवडणं हा प्रत्येकाचा निर्णय आहे. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. जर त्याला तेच करायचं असेल तर मला त्याबाबत काही अडचण नसेल. माझ्याबाबत बोलाल तर मला स्ट्रेट राहायला आवडतं, असं रकूल म्हणाली.
रकूल झाली ट्रोल
सध्या रकूलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही यूजर्सला तिचं उत्तर आवडलं आहे. तिने ज्या वयात हे उत्तर दिलं ते अत्यंत समंजसपणाचं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर काही यूजर्सने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. हे काय उत्तर होतं? मला स्ट्रेट राहायला आवडतं असं कोण म्हणतंय? असा सवाल एका नेटकऱ्याने केला आहे.
अर्थात कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी अभिनेत्रीचा बचावही केलं आहे. नॉर्मल इंडियन आई असंच बोलेल. रकूल काही वेगळी बोलली नाही. नॉर्मल इंडियन आई अशा गोष्टी कधीच स्वीकारणार नाही, असं काहींनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List