‘हे फक्त राक्षसच करू शकतात’, युक्रेनच्या सुमी शहरावर रशियाने केला क्षेपणास्त्र हल्ला, 31 जणांचा मृत्यू
रशियाने आज युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. उत्तरेकडील युक्रेनियन शहर सुमीवर झालेल्या प्राणघातक रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 31 जणांचा मृत्यू झाला आणि 10 मुलांसह 84 हून अधिक जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमेन्को यांनी ही माहिती दिली आहे.
हा हल्ला या वर्षी युक्रेनवरील सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक असल्याचं बोललं जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी हा हल्ला सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे क्रूर कृत्य असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे फक्त राक्षसच करू शकतात, असं म्हणत त्यांनी रशियावर टीका केली आहे.
या हल्ल्याचा निषेध करत झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “हे फक्त राक्षसच करू शकतात. निष्पाप लोकांना मारणे… आणि तेही त्या दिवशी, ज्या दिवशी लोक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातात.” दरम्यान, या हल्ल्याबाबत रशियन बाजूने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List