मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी

मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडजीवळ बसचा एक भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 8 वर्षांच्या मुलीने जीव गमावला आहे. तर या अपघातात 10-12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडीजवळील पडघा गावाजवळ हा अपघात घडला आहे. पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने हा घाला घातला असून 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. अपघाताचे वृत्त समजाताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळू धाव घेत मदकार्य सुरू केलं. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील पडघा वडपे गावाजवळ अपघात घडला. बसचालक अतीवेगात असल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली. आणि मोठा अपघात झाला. अपघातावेळी बसमध्ये 20 प्रवास होते. भिवंडीतील काही कुटुंबीय खडवली येथे पिकनिकसाठी गेले होते. मात्र परत येताना रात्री त्यांच्या बसला अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 10 ते 12 जण जखमी झाले. तर 8 वर्षांची मुलगी मृत्यूमुखी पडली.

या अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी तातडीने भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी तिघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे देखील रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी जखमींची विचारपूस केल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला ‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला...
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने दिली गुड न्यूज; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
मी काश्मीरला जाणार…, पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केलं जाहीर
Video: पाकिस्तानात सलमान खान पार्क करत आहे बाइक? कराचीमधील व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा MahaCPD प्लॅटफॉर्म – राज्यभरातील डॉक्टरांसाठी डिजिटल सीपीडीचे उपक्रम
summer hydration: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्या होऊ नये यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो…