शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया
अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी येथील पीव्हीआर सिनेमागृहात झाला. यावेळी बंगाली चित्रपट सृष्टीसह हिंदी चित्रसृष्टीतील कलाकार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शर्मिला टागोर यांनी सत्यजीत रे यांच्या ‘भूमिका’ या बंगाली चित्रपटात काम केले होते. त्यावेळी त्या अगदी कोवळ्या वयाच्या होत्या. आता ८० व्या वर्षी त्यांनी पुन्हा बंगाली चित्रपटात काम केले आहे. एक बंगाली म्हणून या महान कलाकृतीबद्दल मला अभिमान आहे अशी प्रतिक्रीया बंगाली अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
मी बंगाली असल्याने माझ्यासाठी अभिमानाचा क्षण – पूजा बॅनर्जी
मी येथे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आले आहे. खूप आनंदाची बातमी आणि की त्यांनी आम्हाला इतका चांगला भेट दिली आहे. इतकी चांगली मुव्ही आम्हाला दिली आहे. आता पर्यंत मी ही मुव्ही पाहीलेली नाही. परंतू जितके या चित्रपटाबद्दल मी ऐकलेले आहे ते चांगलेच ऐकले आहे. आता थोड्याच वेळात आम्ही हा चित्रपट पाहणार आहोत. लिजेंडरी शर्मिला टागोर यांनी इतक्यावर्षांनंतर बंगाली चित्रपटात त्याचं पुनरागमन होत आहे. एक बंगाली म्हणून आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्या एक महान अभिनेत्री आहेत. त्यांच्या हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूपच एक्सायटेट आहे.इतक्या चांगल्या कलाकारांनी हा चित्रपट बनला आहे तर ती नक्कीच चांगलीच कलाकृती बनलेली असेल. मला आता राहवत नाही. मी हा चित्रपट पाहून या नक्कीच प्रतिक्रीया देऊ शकते असे बंगाली अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
१४ वर्षांच्या अंतराने अभिनय
ज्येष्ठ अभिनेत्री अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा ‘पुरातन’ या बंगाली चित्रपटाचा प्रीमियर अंधेरी झाला. या प्रीमियर शोला बंगालीसह हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरातन हा चित्रपट ( Puratawn ) आई आणि मुलीच्या नाते संबंधावर बेतलेला आहे. आई आणि मुलीचे अवखळ नाते या चित्रपटात चित्रीत केलेले आहे. यात शर्मिला टागोर यांनी एखाद्या चित्रपटात १४ वर्षांच्या अंतराने काम केले आहे.
पुरातन चित्रपटाचे सर्जक
पुरातन या बंगाली चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सुमन घोष यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे निर्माता ऋतुपर्ण सेनगुप्ता आहेत. या चित्रपटात शर्मिला टागोर, रितुपर्णा सेनगुप्ता , इंद्रनील सेनगुप्ता आणि मीलो कंपोझी, अलोकनंदा दासगुप्ता, दिग्दर्शक म्हणून आदित्य विक्रम सेनगुप्ता, सहयोगी दिग्दर्शक म्हणून तर मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चीफ असिस्टंट डायरेक्टर अविजित चौधरी आणि मोनिका एंजेलिका भोमिका यांनी काम पाहीले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List