परवीन बाबीच्या मृत्यूचं खरं कारण नक्की काय? 3 दिवसांनी घरात आढळला कुजलेला मृतदेह

परवीन बाबीच्या मृत्यूचं खरं कारण नक्की काय? 3 दिवसांनी घरात आढळला कुजलेला मृतदेह

Parveen Babi Death real reason: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री परवीन बाबी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. परवीन बाबी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. जेव्हा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं त्यांच्या घराबाहेर दोन दिवसांपूर्वीचं दूध आणि पेपर पाहिले तेव्हा पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर परवीन बाबी यांचं निधन झाल्याची बातमी चाहत्यांना मिळाला.

परवीनच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठी अत्यंत धक्कादायक होती. आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर तीन दिवसांनी अभिनेत्रीचा मृतदेह खोलीतून बाहेर काढण्यात आला. तेही जेव्हा शेजाऱ्यांच्या लक्षात आले की त्यांच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत आहे तेव्हा पोलिसांनी चौकशी सुरु केली.

या धक्कादायक मृत्यूप्रकरणी पोलिसांनी परवीनचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. कूपर हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये अभिनेत्रीच्या मृत्यूचे कारण अनेक अवयव निकामी झाल्याचे म्हटलं होतं. अभिनेत्रीच्या पोटात अन्नघटक नसल्याचेही रिपोर्टमध्ये उघड झालं. रिपोर्टनुसार, परवीन यांनी खाणं देखील बंद केलं होतं. त्यामुळे अभिनेत्रीची प्रकृती खालावली होती अखेर त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनूसार सतत मद्यपान, सिगरेट आणि वाईट सवयींमुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं. सिजोफ्रेनिया या गंभीर आजाराने परवीन बाबी यांना गाठलं. सिजोफ्रेनिया या आजारासोबतच परवीन यांना मधुमेहचा देखील त्रास सुरु झाला. अखेर आजारपणामुळे महेश भट्ट यांनी परवीन यांची साथ सोडली आणि शेवटच्या क्षणापर्यंत परवीन बाबी एकट्या राहिल्या. परवीन बाबी यांचं निधन देखील अत्यंत हृदयद्रावक झालं.

परवीन बाबी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक अभिनेत्यांसोबत त्यांच्या नावाची चर्चा झाली. पण कोणत्याच अभिनेत्यासोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अभिनेता डॅनी डँझोपा, अभिनेते कबीर बेदी, नंतर परवीन बाबी यांचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत जोडलं जावू लागलं.

ज्या फ्लॅटमध्ये परवीन यांचा मृत्यू झाला, तो फ्लॅट मुंबईतील अतिशय सुंदर ठिकाणी आहे. जुहूमध्ये समुद्राच्या किनाऱ्याजवळ हा फ्लॅट आहे. त्यांच्या मृत्यूनंतर फ्लॉटचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यूयॉर्क हडसन नदीजवळ हेलकॉप्टर अपघात; तीन मुलांसह 6 जणांचा मृत्यू न्यूयॉर्क हडसन नदीजवळ हेलकॉप्टर अपघात; तीन मुलांसह 6 जणांचा मृत्यू
न्यू यॉर्कमधील हडसन नदीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. एबीसी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. न्यू यॉर्कमधील...
अलिबाग, पेणमधील 36 गावांच्या घशाला कोरड, दहा हजार नागरिकांना टँकरचा आधार
अमित शहांच्या दौऱ्यासाठी खारपाडा ते कशेडी वाहतूक उद्या बंद
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला 18 दिवसांची NIA कोठडी, मध्यरात्री अडीच वाजता झाली सुनावणी
भररस्त्यात चुलीवर भाकरी थापत सरकारविरोधात संताप, गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक
दीनानाथ रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठीचा 35 कोटींचा निधी वापरलाच नाही
मिंधेगिरीला भिसे कुटुंबीयांची चपराक, पाच लाखांचा धनादेश केला परत