‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?

‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?

ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची एका बंगाली सिनेमातून दमदार वापसी होत आहे. Puratawn असं या सिनेमाचं नाव आहे. तब्बल 14 वर्षांनंतर त्यांनी चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. आई आणि मुलीच्या जटील नात्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या बंगाली सिनेमातून एका 80 वर्षीय व्यक्तीच्या जीवनातील भूतकाळ आणि वर्तमान काळातील आठवणींच्यामधील संबंधांचं दर्शन घडतं.  शर्मिला टागोर यांनी या सिनेमात अत्यंत दमदार अभिनय केला आहे. त्यांनी व्यक्तीरेखा अक्षरश: जिवंत केली आहे. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा असा त्यांचा अभिनय आहे.

सुमन घोष यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांच्यासोबत   रितुपर्णा सेनगुप्ता आणि इंद्रनील सेनगुप्ता यांनी देखील भूमिका केली आहे. या सिनेमात शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका आहे. तर रितुपर्णा सेनगुप्ता यांनी त्यांच्या मुलीची भूमिका साकारली आहे. मला आज खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री  रितुपर्णा सेनगुप्ता यांनी दिली आहे.

‘मी आज खूप आनंदी आहे,  हा चित्रपट आमच्यासठी खूप स्पेशल आहे. या चित्रपटामध्ये शर्मिला टागोर यांची मुख्य भूमिका आहे. त्यांनी तब्बल 14 वर्षानंतर चित्रपटामध्ये भूमिका केली आहे. ही केवळ एक बंगाली फिल्म आहे, असं मी म्हणणार नाही,  कारण ही एक इंडियन फिल्म आहे. कारण या चित्रपटाला आम्ही सबटायटल्स पण दिलं आहे. त्यामुळे सर्व लोक या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात. या चित्रपटाचं विशेष आकर्षण म्हणजे या चित्रपटामध्ये  शर्मिला टागोर यांची भूमिका आहे, आणि माझा मदर -डॉटर स्टोरीचा एक ब्युटीफूल अँगल आहे. सुमन घोष यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मी एवढंच सांगेल चित्रपटगृहात या हा चित्रपट पाहा, आणि सोबत एक चांगला अनुभव घेऊ जा. प्रेक्षकांसाठी हा एक खास अनुभव देणारा चित्रपट आहे. आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये जे काही सुरू आहे, त्याची खास झलक तुम्हाला या चित्रपटामधून पाहायला मिळू शकते. या चित्रपटामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रेक्षकांना आवडतील, असं रितुपर्णा सेनगुप्ता यांनी म्हटलं आहे.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान 2019 पर्यंत भाजप चांगला, त्यानंतर महाराष्ट्रद्रोही कसा? मनसे नेत्याचे युतीच्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठ्या घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु...
विलेपार्लेतील जैन मंदिर पुन्हा बांधणार? आता पुढचं पाऊल काय? वॉर्ड अधिकार्‍याच्या त्या आश्वासनानं जैन समाजाचं झालं का समाधान?
आता कुठं राज ठाकरे यांनी मन मोकळं केलंय..मग शिवसेनेची भूमिका काय? खासदार संजय राऊतांनी सांगितलं काय हवंय वचन?
‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंना मविआत एन्ट्री? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं थेट सांगितलं..
उद्धव आणि राज यांची युती होणार का?…राजकीय नेत्यांनी काय दिल्या प्रतिक्रीया…
महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का?, उद्धव ठाकरे कडाडले