पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरीमध्ये मालिकेचं शूटिंग; श्वेता शिंदेची ‘हुकुमाची राणी ही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरीमध्ये मालिकेचं शूटिंग; श्वेता शिंदेची ‘हुकुमाची राणी ही’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘सन मराठी’ वाहिनीवर येत्या 21 एप्रिलपासून दररोज संध्याकाळी 7 वाजता ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेतील नायक – नायिकेची गोष्ट ही फॅक्टरीमधूनच सुरु होणार आहे. मालिकेचं शूटिंगही खऱ्या फॅक्टरीमध्ये होत आहे आणि हाच  धागा पकडून मालिकेची पत्रकार परिषद सातारामधील फॅक्टरीमध्ये पार पडली. बऱ्याचदा मालिकांमध्ये ऑफिस, फॅक्टरी या ठिकाणांसाठी सेट उभारला जातो. पण या मालिकेचं शूटिंग साताऱ्यामधील खऱ्या फॅक्टरीमध्ये पार पडणार आहे. या मालिकेच्या टीमसाठी ही एक आव्हानात्मक बाब असणार आहे.

मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ही राणीची भूमिका तर इंद्रजीतची भूमिका अक्षय पाटील साकारत आहे. या दोघांबरोबरच अभिनेत्री अंकिता पनवेलकर, अभिनेते राहुल मेहंदळेंसह आणखी बरेच दिग्गज कलाकारही मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेत राहुल मेहंदळे हे जयसिंगराव महाडिक या महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. महाडिक इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा जयसिंगराव महाडिक सेवानिवृत्त झाल्यानंतर महाडिक इंडस्ट्रीचा कारभार त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करतात. जयसिंगराव असा निर्णय घेतात ज्यामुळे राणीचा महाडिक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश होतो. आता माणुसकी जपणारी राणी आणि माणुसकीपेक्षा पैशाला महत्त्व देणारा इंद्रजीत समोरासमोर येणार तेव्हा नक्की काय होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sun Marathi (@sunmarathi)

या मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे पत्रकार परिषेदत म्हणाली, “मालिकाविश्वात पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरीमध्ये ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. हे मोठं पाऊल आम्ही उचललं आहे. याचसह इंद्रजीत आणि राणीची नवी गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. या मालिकेसाठी प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर माझ्या आईची फॅक्टरी आहे. महाडिक इंडस्ट्रीमध्ये जशी राणी आहे अगदी तशीच राणी आमच्या फॅक्टरीमध्ये पण होती. आणि त्या राणीला पाहूनच ही गोष्ट सुचली. या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच पण माणुसकी जपण्याचा सल्ला मिळणार आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर जसा प्रेमाचा वर्षाव केला अगदी तसेच मालिकेवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी खात्री आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा