तुमच्याही किचनमध्ये आहे का ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा धोका निर्माण करणारे हे तेल! संशोधनात खळबळजनक खुलासा
कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा एक प्राणघातक आजार असल्यामुळे, या आजाराला आजही खूप घाबरले जाते. दरवर्षी जगभरात लाखो लोक कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. कॅन्सर टाळण्यासाठी आपण आपल्या लाइफस्टाइलमध्ये योग्य ते बदल करणे खूप गरजेचे आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी तपासणी करणे हे आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. अलीकडे केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याचे कारण या तेलांमध्ये आढळणारे लिनोलिक आम्ल आहे. यामुळे स्तनाचा कर्करोग झपाट्याने वाढू शकतो. या संशोधनात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत.
द कॉन्व्हर्सेशनने नुकताच एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार अभ्यासात असे आढळून आले आहे की, स्वयंपाकाच्या तेलांमध्ये आढळणारे लिनोलिक अॅसिड नावाचे घटक ट्रिपल-निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकते. स्तनाच्या कॅन्सरमधील हा सर्वात धोकादायक मानला जातो. यामध्ये रुग्णाची जगण्याची शक्यता खूपच कमी असते. हे संशोधन न्यू यॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, लिनोलिक आम्ल कर्करोगाच्या पेशींमध्ये FABP5 असल्यामुळे, कॅन्सर ट्यूमरची वाढ अतिशय वेगाने होते.
शास्त्रज्ञांच्या मते, लिनोलिक अॅसिड हे ओमेगा-६ फॅटी अॅसिड आहे. हे प्रामुख्याने सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि कॉर्न तेलामध्ये आढळते. इतर अनेक बियांच्या तेलांमध्येही लिनोलिक आम्ल चांगल्या प्रमाणात असते. याव्यतिरिक्त डुकराचे मांस, अंडी यामध्ये आढळते. या गोष्टी रोज आहारात खाल्ल्याने शरीरामध्ये जळजळ वाढते आणि त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यास वाव मिळतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List