क्रिकेटर मला न्यूड फोटो पाठवायचे आणि…, लिंग बदल केलेल्या अनाया बांगरचा खळबळजनक आरोप
हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मुलाने गेल्या वर्षी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली. आता तोचा ती होऊन अनाया बांगर या नावाने ओळखली जाते. पूर्वी आर्यन नाव असलेला आता अनाया एक खेळाडू आहे. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटमध्ये करिअर करताना अनायाला मोठे अडथळे होते. यासंदर्भात तिने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
अनाया युनायटेड किंग्डममध्ये (लंडन) राहते. लंडनमध्ये बराच काळ राहिल्यानंतर अनाया बांगर आता हिंदुस्थानात परतली आहे. येथे येताच तिने एका मीडिया संस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने स्फोटक आरोप केले आहेत. अनायाने क्रिकेट जगतातील काही मोठे खुलासे केले. क्रिकेट विश्वात टिकून रहाणे फार कठीण आहे. मी लिंग बदलाची प्रक्रिया केल्यानंतर मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. मी मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जयस्वाल सारख्या काही प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळले आहे. माझे वडील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्याने मला स्वतःबद्दल गुप्तता बाळगावी लागली. पण क्रिकेट जगत खूप असुरक्षित असल्याचे मला जाणवले, असे ती म्हणाली.
मी लिंग परिवर्तन केल्यानंतर मला याचा त्रास जाणवला. मी खूप छळ सहन केला आहे. काही क्रिकेटपटू मला त्यांचे घाणेरडे फोटो पाठवायचे. अनेक मॅसेजेस करायचे. चला गाडीत बसूया, आम्हाला तुमच्यासोबत सेक्स करायचा आहे…. काही क्रिकेटपटू सर्वांसमोर मला शिवीगाळ करायचे आणि नंतर फोटो मागायचे. जेव्हा लिंग बदलले तेव्हाच मला वडिलांनी सांगितले की तू क्रिकेट सोड… आता क्रिकेटमध्ये तुझ्यासाठी जागा नाही. मात्र मी या क्षेत्रात टीकून राहिले, असे ती यावेळी म्हणाली.
दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ट्रान्सजेंडर खेळांडूंबाबत एक निर्णय घेतला. ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयमुळे अनाया निराश झाली असल्याचे तिने म्हटले आहे. यासंदर्भात अनायाने इन्स्टाग्रामवर आयसीसीच्या नवीन नियमाबद्दल निराशा व्यक्त करण्यासाठी एक लांबलचक पोस्ट देखील शेअर केली.
संजय बांगरप्रमाणेच अनाया ही देखील एक क्रिकेटपटू आहे. तिने स्थानिक क्लब क्रिकेटमध्ये इस्लाम जिमखान्याचे प्रतिनिधित्व केले आहे.
संजय बांगर यांच्या मुलाने केली लिंगबदलाची शस्त्रक्रिया, आर्यनची झाली अनया
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List