अमेरिकेच्या टॅरिफवर PM मोदींचे ‘मौन व्रत’, काँग्रेसने केली टीका
अमेरिकेने हिंदुस्थानावर 26 टक्के टॅरिफ लादले आहे. यावर अद्यापही मोठी सरकराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यावरूनच काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.
आज दिल्लीत एका आयोजित पत्रकार परिषदेत गौरव गोगोई म्हणाले की, “अमेरिकेने युरोपियन महासंघ आणि जपानवर कमी टॅरिफ लावला आहे. हेही अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत. मात्र त्यांच्यावर कमी टॅरिफ लावण्यात आला आहे. पण हिंदुस्थानावर अमेरिकेने 26 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा मोठा परिणाम सोने, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर गोष्टींवर पडणार आहे. विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले जात आहेत. आपल्या लोकांना तेथून हातात आणि पायात बेड्या ठोकून पाठवलं जात आहे. या सगळ्या गोष्टींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्पा आहेत.”
गौरव गोगोई म्हणाले, “अनेक देशांचे अमेरिकेशी चांगले संबंध आहे. त्या देशातील नेत्यांनीही आपल्या राष्ट्रहितात म्हटलं आहे की, अमेरिकेचा टॅरिफचा जो निर्णय आहे, तो चुकीचा आहे. मात्र या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांच्याकडून आम्ही अद्याप काहीही ठोस ऐकलेले नाही.” ते म्हणाले, “काही महिन्याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र यांची जी बैठक झाली, त्यांचीही भेट फ्लॉप ठरली. याचाच परिणाम आपल्याला काल पाहायला मिळाला.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List