Rain Alert – मुंबईत पुढील 3-4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
गेल्या चार दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यानंतर आज मुंबईत पुढील तीन-चार तासांत वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह आसपासच्या परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ येथे सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मध्य रेल्वेवरील आटगाव-थानशेत स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर पत्रा अडकल्याने कसाऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List