महाराष्ट्रात मिळाले लुप्त विशाल स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म; पाषणयुगीन अवजारेही आढळली

महाराष्ट्रात मिळाले लुप्त विशाल स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म; पाषणयुगीन अवजारेही आढळली

सुमारे 25 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म चंद्रपूर जिल्हात सापडले आहेत. महाराष्ट्रात अशाप्रकारची अलीकडील प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मिळ जीवाश्म आहेत. डायनोसोरनंतर विशालकाय प्राण्यांची जीवाश्मे पहिल्यांदाच विदर्भात आढळली आहेत. या जीवाश्मांसोबतच पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत. दुर्मिळ हत्तीचे जीवाश्म आणि पाषाणयुगीन अवजारे एकाच ठिकाणी सापडणे अतिशय महत्वाचे मानले जाते, असे शोधाकर्ते प्रा. सुरेश चोपणे यांनी म्हटलं आहे.

ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि सुमारे 25 हजार वर्षांदरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची ( Stegodon Ganesa) आहेत. हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत, असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलोजीचे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा ह्यांनी व्यक्त केले आहे. हे हत्ती 23 ते 26 हजार वर्षांपूर्वी लुप्त झाले. ते आजच्या आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. याच ठिकाणी एलेफास नामाडीकस (Elephas Namadicus) या लुप्त झालेल्या हत्तीसदृश्य डोके सुद्धा आढळल्याने या हत्तीच्या जीवाश्मांचे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे.

प्लेईस्टोसीन या 2 लाख ते 11,700 वर्षाच्या कालखंडात हिंदुस्थानात हत्तींचे आणि पाषाणयुगीन मानवांचे मोठ्या संख्येत वास्तव्य होते. याच काळाच्या शेवटच्या कालखंडात हिमयुग होते. जेव्हा हे हिमयुग वितळले तेव्हा हिंदुस्थानात प्रचंड महापूर आले आणि या महापुरात अनेक प्रजाती वाहून गेल्या. त्याच पुरातील गाळात (अल्लुव्हींयम) अनेक सजीवांचे पुरावे सापडतात. चंद्रपूर जिल्ह्यात सापडलेले हत्ती हे 15 फुट उंचीचे विशाल जीव होते आणि लुप्त झालेल्या हे स्टेगाडॉन हत्तींची ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमच सापडली आहेत, अशी माहिती संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

प्रा.चोपणे हे 2019 ते 2024 पर्यंत प्लेईस्टोन काळातील गाळात जीवाश्मे शोधत होते. त्यांना 2020-21 मध्ये प्रथमच चंद्रपूर तालुक्यात वर्धा आणि पैनगंगा नदी पात्रात संगमाजवळ जीवाश्मे मिळाली. संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरु असतानाच 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली. त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे 2024-25 मध्ये पूर्ण झाले असून ही सर्व जीवाश्मे त्यांनी घरी स्थापन केलेल्या सुरेश चोपणे रॉक म्युझियम मध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या संग्रहालयात ठेवली आहेत. भूगोल, भूशास्त्र, जीवशास्त्र आणि विज्ञान शाखेच्या संशोधक विध्यार्त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

मिळालेली जीवाश्मे सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे, चर्वण करणारी दात -(Molar) आणि डोक्याची कवटी, छातीची हाडे अशा अवयवांचा समावेश आहे. अजून हत्तीची दोन लांब सुळे मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली असल्याने महत्वाचे पुरावे नष्ट झाली आहेत. परंतु अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत. सविस्तर उत्खननात ती बाहेर येवू शकतात. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच तेलंगाना मध्ये हत्तीची आशियायी हत्तींची जीवाश्मे मिळाली आहेत. परंतु स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

पाषाण युगीन मानवाची अवजारे आढळली
या संशोधनाचा महत्वाचा घटक म्हणजे या हत्तींच्या जीवाश्मासोबत पाषाणयुगीन मानवानी बनविलेले दगडी अवजावरे सापडली आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाश्मे आणि पाषाण युगीन अवजारे सापडल्यामुळे मानव हत्तींची शिकार करीत होते हे सिध्द होते. तर मानवाच्या अति शिकारीमुळे आणि देखील हत्ती लुप्त झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे सापडलेल्या अवजारात हात कुऱ्हाडी (हॅन्ड एक्स), आणि इतर प्रकारची अवजारे चोपणे ह्यांना आढळली असून ती त्यांनी त्यांच्या संग्रहालयात ठेवलेली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला? उद्धव ठाकरे यांनी सांगितले कारण
संसदेत संमत झालेल्या वक्फ बोर्डाच्या विधेयकास शिवसेना उबाठाने विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना उबाठावर टीका होऊ लागली होती. शिवसेना कामगार...
Jain Community Protest : जैन समाजाचा आजपर्यंत कधी आवाज ऐकला होता का? वर्षा गायकवाड यांचा सवाल
जेवण नव्हतं, 2oवर्ष फक्त 500 रुपयांवर हॉटेलमध्ये काम केलं; अन् आज अभिनेत्री कोट्याधीश
स्वतःच्या आनंदासाठी मी दुसऱ्या महिलेचे…; शबाना आझमी यांचा लग्नाबाबत खळबळजनक खुलासा
‘पुरुषांना मासिक पाळी आली असती तर…’, तिरस्काराने दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांवर जान्हवीने साधला निशाणा
तेच हसणं, तिच्यासारखेच हावभाव, तोच आवाज; तरुणीने केली प्राजक्ता माळीची हुबेहूब नक्कल, व्हिडीओ व्हायरल
‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा