IPL 2025 – जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी सज्ज, अजून किती सामने वाट पहावी लागणार? वाचा…

IPL 2025 – जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी सज्ज, अजून किती सामने वाट पहावी लागणार? वाचा…

मुंबई इंडियन्सचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्सचा शुक्रवारी (4 एप्रिल 2025) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध सामना होणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात संघ विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले. परंतु या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह बराच काळ क्रिकेटपासून लांब आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने तंदुरुस्त होण्यासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रामध्ये जसप्रीत घाम गाळताना दिसत आहे. त्याचबरोबर फिटनेस टेस्टच्या शेवटच्या टप्यावर तो आला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने पूर्णपणे अनुमती दिल्यानंतर जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून लवकरच मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर आयपीएल संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या दृष्टीनेही जसप्रीत बुमराहचे फिट होणे टीम इंडियासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे. ESPNcricinfo ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये मुंबई इंडियन्सने काही नवीन खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. विग्नेश पुथुर, अश्विनी कुमार आणि सत्यनारायण राजू या नवख्या खेळाडूंनी आपलं नाण खणखणीत वाजवलं आहे. त्याचबरोबर ट्रेन्ट बोल्ट आणि दीपक चहर याचा अनुभव सुद्धा संघाच्या कामी येत आहे. मुंबईने आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामने गमावले आहेत तर, एका सामन्यामध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 7 एप्रिलला बंगळुरूविरुद्ध वानखेडेवर होणार आहे. या सामन्यात सुद्धा जसप्रीत बुमराह खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज आणि 7 तारखेला होणाऱ्या सामन्यानंतर जसप्रीत मैदानात उतर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून...
‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस
वक्फवरून गुजरात, बिहारसह आठ राज्यांत भडका, जुम्म्याच्या नमाजानंतर ठिणगी पडली; रस्त्यावर उद्रेक, उग्र निदर्शने
तुमच्या वादाशी प्रकल्पग्रस्तांना काहीही देणे घेणे नाही, मिठी नदी प्रकल्पबाधित भरपाईच्या प्रतीक्षेत; हायकोर्टाने सरकारला सुनावले
डोंगरी बालगृहातील मुलांची ‘हाऊसफुल्ल’कलाकारी, मुलांच्या काल्पनिक व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांची पसंती
अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला