देशाचे पासपोर्ट रँकिंग घसरले, टाईम्सच्या ‘टॉप 100’ मधून मोदी गायब; मोदींचा उदो उदो करणाऱ्यांना चपराक
अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम्स मॅगेझीन दरवर्षी जगातील प्रसिद्ध 100 व्यक्तींची नावे जाहीर करते. यंदाच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नाही. तसेच देशाची अनेक आघाड्यांवर पिछाडी सुरू आहे. देशाची अधोगती होत असतानाही मोदी समर्थकांकडून नरेंद्र मोदींचे आणि भाजपचे महिमामंडन करणे आणि गुणगाण सुरू आहे. सोशल मिडीयावर याबाबत रोष व्यक्त होत आहे.
यंदाच्या टाईम्सच्या जगातील प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश नाही. यात बांगलादेशचे अंतरिम सरकारचे सल्लागार मुहम्मद युनूस यांचाही समावेश आहे. मात्र, मोदी यांचा समावेश या यादीत नसल्याने अमेरिकेच्या लेखी हिंदुस्थानचे काय महत्त्व आहे, हे दिसून येत आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मोदी यांची जिगरी दोस्ती असल्याचा डांगोरा मोदी समर्थक पिटत असतात. मात्र, टॅरिफ धोरणांमध्ये अमेरिकेने हिंदुस्थानला काहीही किंमत दिली नसल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे फक्त अमेरिकाच नाही तर जगभरात हिंदुस्थानचा दबदबा कमी होत असल्याचे चित्र आहे.
पासपोर्ट रँकिंगमध्येही हिंदुस्थानची घसरण झाली आहे. हिंदुस्थान 5 क्रमांकाने घसरून 85 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच अमेरिकेतील प्रतिष्ठित 30 विद्यापीठांनी हिंदुस्थानी विद्यार्थांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे देशाची सर्वत्र अधोगती होत आहे. तसेच परदेशात गेल्यावरही हिंदुस्थानींकडे वेगळ्या नजरेने बघितले जात आहे. जगातिक स्तरावर देशाचा दबदबा कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र, देशात मोदी समर्थक नरेंद्र मोदी आणि भाजपचे गुणगाण करण्यात मग्न आहेत. कितीही अधोगती झाली तरी आम्हीच श्रेष्ठ, गिरे तोभी टांग उपर असेच मोदी समर्थकांचे झाले आहे. सोशल मिडीयावर याबाबत संताप व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List