Nuts Benefits- आपल्या आहारासाठी बदाम आणि शेंगदाणे वरदानापेक्षा कमी नाही! वाचा सविस्तर
बदाम आणि शेंगदाणे हे शरीरासाठी अगदी फायदेशीर मानले जातात. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात त्याचबरोबर शेंगदाणे हे प्रथिनांचे स्वस्त आणि उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यात बदामांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात. हे स्नायू तयार करण्यास आणि शरीर मजबूत करण्यास मदत करते. अनेकजण आरोग्यासाठी आहारात या सुपरफुड्स चा समावेश करुन घेतात. तसेच याचे अनेक फायदे देखील आहेत.
बदाम खाण्याचे फायदे
- बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे कोलेस्टेरॉल नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवतात.
- बदामाच्या सेवनाने हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. हाडे मजबूत करते. बदामांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
-
बदाम दुधात घालून प्यायले तर ते आणखी फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यास बदामचा उपयोग होतो. बदाममध्ये फायबर आणि निरोगी चरबी असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि वजन कमी करणे सोपे होते.
शेंगदाणे खाण्याचे फायदे
- शेंगदाणे हे प्रथिनांचे स्वस्त आणि उत्कृष्ट स्रोत आहे. शेंगदाण्यामध्ये बदामांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात. शरीरात स्नायू तयार करण्यास आणि शरीर मजबूत करण्यास मदत करते.
- हृदयाच्या आरोग्यासाठी देखील शेंगदाने पौष्टीक मानले जातात. बदामांप्रमाणेच शेंगदाणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. शेंगदाण्यामध्ये असलेले ओमेगा-6 फॅटी अॅसिड हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
- शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहे.
-
शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. शेंगदाण्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. जर उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या असेल तर शेंगदाणे खाऊ शकता.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List