आयब्रोज विरळ आहेत धड आकारही नाहीये, मग आता चिंता सोडा! घरच्या घरी या उपायांनी आयब्रोजला द्या नवा लूक
आपल्या सौंदर्यात आयब्रोजचे महत्त्वही तितकेच आहे. म्हणूनच चेहऱ्याच्या मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप हा सर्वात जास्त कठीण मानला जातो. आयमेकअपमध्ये भुवया आणि आयलॅशेस हेही तितकेच महत्त्वाचे आहेत. काही जणींच्या भुवया अक्षरशः इतक्या विरळ असतात की, भुवया आहेत की नाही असाच प्रश्न पडतो. त्यामुळे अशा मुलींचे किंवा महिलांचे कपाळ खूप मोठे दिसते. शिवाय विरळ भुवया असताना आयब्रो पेन्सिल वापरल्यास ते अधिक विचित्र दिसू लागते. म्हणूनच विरळ भुवयांना सुंदर बनवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करणेही गरजेचे आहे.
नैसर्गिकरित्या जाड दाट आयब्रो हवे असल्यास, हर्बल आयब्रो ग्रोथ सीरम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. रासायनिक सीरम किंवा महागड्या उपचारांपेक्षा घरगुती उपाय हा केव्हाही उपयुक्त मानला जातो. शिवाय आपल्या बजेटमध्येही घरगुती उपाय येतात. मुख्य म्हणजे पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, हा उपाय त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरतो. हर्बल आयब्रो ग्रोथ सीरम बनवण्यासाठी औषधी वनस्पती तसेच एरंडेल तेल आणि मेथी सारख्या घटकांचा वापर करता येईल. सीरम्सची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, आपण स्वयंपाकघरातील उपलब्ध वस्तूंनपासून हे सीरम अगदी काही मिनिटांत बनवू शकतो.
हर्बल आयब्रो ग्रोथ सीरम कसे बनवाल?
व्हिटॅमिन ई कॅप्सूल, बदाम तेल आणि कोरफड जेल
साहित्य-
2 टेबलस्पून ताजे कोरफड जेल
1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल
1/2 चमचा बदाम तेलकसे बनवायचे आणि कसे वापरायचे –
प्रथम, व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडा आणि त्यात कोरफडीचे जेल घाला. आता त्यात बदाम तेल घाला आणि चांगले मिसळा.
आता त्याचा पातळ थर तुमच्या भुवयांवर लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने धुवा.
जास्वंद आणि नारळतेल सीरम
साहित्य-
2 जास्वंदीची फुले
2 चमचे नारळ तेलकसे बनवायचे आणि कसे वापरायचे –
सर्वप्रथम जास्वंदीची फुले बारीक करून पेस्ट बनवा. आता नारळाचे तेल हलके गरम करा आणि त्यात बारीक केलेल्या जास्वंदीची पेस्ट मिसळा. एक तास तसेच राहू द्या. आता तेल गाळून घ्या. सर्वोत्तम परिणामांसाठी हे तेल दररोज तुमच्या आयब्रोजना लावा.
ग्रीन टी आणि जोजोबा तेल
साहित्य
1 ग्रीन टी बॅग
2 टेबलस्पून जोजोबा तेलकसे बनवायचे आणि कसे वापरायचे
कोमट जोजोबा तेलात ग्रीन टी बॅग काही तास भिजवा. आता ग्रीन टी बॅग काढा आणि तेल एका बाटलीत ठेवा. झोपण्यापूर्वी हे तुमच्या भुवयांवर लावावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List