National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी

National Kho-Kho Championship 2024-25 – महाराष्ट्राच्या महिलांची जोरदार मुसंडी, पुरुष गटात रेल्वेने मारली बाजी

महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमाखदार खेळाचे प्रदर्शन करत 57व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान ओडिशावर 25-21 असा थरारक विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष गटात रेल्वेच्या संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला 36-28 अशी मात देत बाजी मारली. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचे हे 26 वे तर रेल्वेचे 12 वे अजिंक्यपद ठरले आहे.

महिला गटात महाराष्ट्राची विजयी घोडदौड कायम

पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत यजमान ओडिशाचा प्रतिकार मोडून काढला. सामन्याच्या मध्यंतराला दोन्ही संघ 10-10 अशा बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्राने अचूक रणनीती आणि दमदार संरक्षणाच्या जोरावर सामन्यावर वर्चस्व मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

पुरुष गटात रेल्वेची विजयी पताका

पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्रावर 36-28 अशी निर्णायक मात करत अजिंक्यपद आपल्या नावावर केले. मध्यंतराला रेल्वेने 21-12 अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने 15-15 अशी जोरदार मुसंडी मारली पण रेल्वेने पाहिल्या डावात घेतलेली आघाडी महाराष्ट्राच्या पराभवाचे कारण ठरली.

महाराष्ट्राच्या संघाकडून लक्ष्मण गवस आणि मिलिंद चावरेकर यांनी प्रत्येकी 1.40 मि. संरक्षण करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पियुष घोलमने 6 गुण मिळवत, तर निहार दुबळे, रुद्र थोपटे आणि सुयश गरगटे यांनी प्रत्येकी 4 गुण मिळवत विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले व महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

महाराष्ट्राचा विजेता महिला संघ – अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे).

प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : अनिल रौंदाळ (नंदुरबार), व्यवस्थापक : संध्या लव्हाट (अहिल्यानगर).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून...
‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस
वक्फवरून गुजरात, बिहारसह आठ राज्यांत भडका, जुम्म्याच्या नमाजानंतर ठिणगी पडली; रस्त्यावर उद्रेक, उग्र निदर्शने
तुमच्या वादाशी प्रकल्पग्रस्तांना काहीही देणे घेणे नाही, मिठी नदी प्रकल्पबाधित भरपाईच्या प्रतीक्षेत; हायकोर्टाने सरकारला सुनावले
डोंगरी बालगृहातील मुलांची ‘हाऊसफुल्ल’कलाकारी, मुलांच्या काल्पनिक व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांची पसंती
अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला