जगा‘वेगळा’ देश… दुर्गम बेटावर पहिले एटीएम सुरू
आधुनिक काळात बँक आणि बँक सुविधांचे महत्त्व वाढले आहे. अगदी लहान गाव, शहरामध्ये सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असतात, एटीएमदेखील असते. मात्र जगात असा एक देश आहे, जिथे एकही एटीएम नव्हते. सर्व व्यवहार रोखीने व्हायचे. दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला हा देश असून त्याचे नाव तुउलू आहे. जगा‘वेगळा’ देश अशी त्याची ओळख आहे. मात्र आता या देशात पहिले एटीएम सुरू झाले आहे. तुउलू बेटाने इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या जगात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.
नॅशनल बँक ऑफ तुउलूच्या मुख्यालयात एटीएम लोकार्पणाचा ऐतिहासिक सोहळा नुकताच रंगला. तुउलू या देशाची लोकसंख्या जेमतेम 11 ते 12 हजार आहे. जगातील हे सर्वात लहान राष्ट्र आहे. सुमारे 26 चौरस किलोमीटर क्षेत्रात देश पसरलेला आहे. तुउलू देशात दुपारी दोन वाजता बँक बंद होण्यापूर्वी पैसे काढण्यासाठी रांगा लागायच्या. किरणा सामान, खरेदी, हॉटेलिंग सगळ्यासाठी रोख रक्कम द्यावी लागायची. मात्र आता तिथे पाच एटीएम बसवण्यात आले आहेत. पंतप्रधान फेलेटी टिओ, गव्हर्नर जनरल, वडीलधारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एटीएम लोकार्पणाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List